Published On : Tue, Jul 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एसीबीच्या ट्रॅपपूर्वीच रंगला थरार; प्रशिक्षणार्थी पीएसआयने व्हॉईस रेकॉर्डर घेऊनच ठोकली पळ!

Advertisement

नागपूर :नागपूरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकावर (पीएसआय) लाच मागितल्याचा गंभीर आरोप झाला आहे. रस्ते अपघात प्रकरणातील चालकाचे नाव आरोपींच्या यादीतून वगळण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) करण्यात आली होती. या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला होता. मात्र कारवाईपूर्वीच संशय आल्याने संबंधित पीएसआयने तक्रारदाराची झडती घेत त्याच्याकडील व्हॉईस रेकॉर्डर हिसकावून घटनास्थळावरून पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, अपघात प्रकरणातील चालकाचे नाव आरोपींच्या यादीतून काढून टाकण्याच्या मोबदल्यात प्रशिक्षणार्थी पीएसआय निलेश वाघ यांनी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. चालकाने लाच देण्याऐवजी थेट एसीबीकडे तक्रार दाखल केली. प्राथमिक पडताळणीत तक्रारीतील बाबींना दुजोरा मिळाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध पद्धतीने ट्रॅप लावण्याची तयारी केली.

योजनेनुसार तक्रारदाराला ३० हजार रुपयांची रक्कम आणि संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉईस रेकॉर्डर देण्यात आला. त्यानंतर टेकडी रोड परिसरात तक्रारदाराची आरोपी पीएसआयशी भेट घडवून आणण्यात आली. भेटीदरम्यान लाचेची मागणी पुन्हा करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र पैसे स्वीकारण्यापूर्वीच संबंधित अधिकाऱ्याला संशय आला.

यानंतर पीएसआयने तक्रारदाराची झडती घेत त्याच्याकडील व्हॉईस रेकॉर्डर जप्त केला आणि तो घेऊनच घटनास्थळावरून निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे एसीबीचा संपूर्ण ट्रॅप फसला आणि आरोपीला रंगेहात पकडण्याची कारवाई अपूर्ण राहिली.

Advertisement

या घटनेनंतर नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र या प्रकरणाबाबत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा निवेदन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाबाबत अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.