Published On : Sun, Jan 26th, 2020

स्वच्छ आणि स्मार्ट शहराच्या दिशेने नागपूरची वाटचाल : महापौर संदीप जोशी

मनपा मुख्यालयात ध्वजारोहण : स्वच्छतादूतांचा सत्कार

नागपूर : स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होतेच आहे, पण त्यासोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून लोकसहभागातून नागपूर शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी केले.

Advertisement

सिव्हील लाईंन्स येथील नागपूर महानगरपालिका मुख्यालयात महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर उपमहापौर मनीषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका प्रगती पाटील, रुपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार, भगवान मेंढे, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.

Advertisement

याप्रसंगी बोलताना महापौर संदीप जोशी यांनी नागपुरात प्रदुषणमुक्तीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जुन्या बसेस बायोसीएनजीवर करण्यात आल्या. इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, ई-रिक्षा, सोलरवरील मेट्रो आदींचा उहापोह त्यांनी केला. स्वच्छतेच्या सवयी लागण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध अभियानाचीही माहिती त्यांनी दिली. ७३ व ७४ व्या घटनादुरुस्तीसंदर्भात उल्लेख करीत मतदानाचे महत्त्व त्यांनी सांगितले. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकशाही पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले असून या काळात मतदार नोंदणी करा आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन केले.

यावेळी स्वच्छतादूत म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निवृत्त शाखा व्यवस्थापक सुनील भागवत, स्वच्छतेविषयक जनजागृती करणाऱ्या तेजस्विनी महिला मंडळाच्या अध्यक्ष किरण मुंधडा, रस्ता सुरक्षा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मनपा आसीनगर झोनचे कनिष्ठ कर आकारणी निरिक्षक चंद्रशेखर मोहिते, अग्निशमन विभागाच्या सक्करदारा केंद्राचे ऐवजदार वाहनचालक शब्बीर शेख यांचा महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या अग्निशमन विभागाच्या परेडची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाचे संचालन एनएसएसडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केले. आभार सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी मानले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, एनईएसएलचे संचालक डॉ. आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त राजेश मोहिते, निर्भय जैन, डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, सर्व विभागप्रमुख, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement