Published On : Wed, Jun 7th, 2023

महाविकास आघाडीला पाडा आणि एकनाथ शिंदेंना अडकवा ; अमृता फडणवीस यांचे व्हॉटसअप चॅट समोर ….

f

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुकी माफिया अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित आता नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत.

कुख्यात क्रिकेट बुकी जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांच्याविरुद्ध लाचखोरी-खंडणी प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राशी संलग्न व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स सध्या समोर आले आहेत.

Advertisement

जयसिंघानी यांनी सांगितले की त्यांच्याकडे अमृता फडणवीस यांचे काही रेकॉर्डिंग आहेत. ज्यात अमृता फडणवीस म्हणाल्या की महाविकास आघाडीला पाडा आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांना अडकवा, असे त्या म्हणाल्या आहेत. ‘द हिंदू’ वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे.

अनिल जयसिंघानी हे अनिक्षा हिचे वडील आहेत. २०२१ मध्ये तिची अमृता फडणवीस यांच्यासोबत भेट झाली. यादरम्यान तिचे अमृता यांच्याशी जवळीक वाढवली. २० फेब्रुवारीला अमृता यांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार, अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांची व्हॉईस नोट्स आणि व्हिडिओ क्लिप सार्वजनिक करण्याची धमकी दिली. जर तिने 10 कोटी रुपये दिले नाहीत आणि तिच्या वडिलांना सर्व गुन्ह्यातून मुक्त केले नाही तर अनिक्षा व्हॉईस नोट्स आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करणार होती. तसेच वडिलांना त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमधून मुक्त करण्यासाठी अनिक्षा हिने अमृता फडणवीसला १ कोटीची लाच देऊ केली होती.

हे प्रकरण उघडकीस येताच 16 मार्च रोजी बुकी माफिया अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा जयसिंघानी यांना अटक करण्यात आली होती. अनिक्षा हिला 27 मार्च रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी गेल्या महिन्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल जयसिंघानी आणि अनिक्षा यांचा अमृता फडणवीस यांच्यासोबत झालेला व्हॉट्सअॅप चॅट्स समोर आला आहे.

जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांना पाठवलेल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये म्हटले की, गेल्या शिवरात्रीला तुम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सांगितले होते. एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांना कसे अडकवायचे त्यासंदर्भात माझ्याकडे सर्व रेकॉर्डिंग आणि पुरावे आहेत. काळजी करू नका- शिवरात्रीच्या शुभेच्छा, असे जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांना म्हणाले आहेत. अनिल जयसिंघानी अमृता फडणवीस यांना सांगत आहेत, “माझ्या मुलीने तुम्हाला डॉलर्समध्ये रोख रक्कम दिली आहे. त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग असल्याचा त्यांचा दावा आहे.

दोघांमधील दुसर्‍या चॅटमध्ये अनिल जयसिंघानी अमृता फडणवीस यांना म्हणाले की, आम्हाला फक्त न्याय हवा आहे बाकी काही नको. मागील सरकार म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात पोलिस आयुक्त हेमंत नागराळे आणि संजय पांडे यांच्या कार्यकाळात पुनर्तपासणी झाली होती आणि माझ्यावर बोगस गुन्हे दाखल झाल्याने दोन्ही प्रकरणे बंद पडण्याच्या मार्गावर होती.. त्यानंतर जेव्हा सत्ताबदल झाला तेव्हा देवेन भारती [विशेष आयुक्त] मुंबई पोलिसात परत येणार हे सर्वांना माहीत होते कारण ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत, असे जयसिंघानी अमृता फडणवीस यांना चॅटमध्ये म्हणत असल्याचे समोर आले आहे .

Advertisement
Advertisement
Advertisement