Published On : Fri, Mar 6th, 2020

सब ज्युनियर अॅथलेटीक्स स्पर्धेत बीकेसीपी स्कुल चे खेडाळु अव्वल

कन्हान : – नागपुर जिल्हा अॅथलेटीक्स असोशिएशन अंतर्गत आयोजित सब ज्युनिअर अॅथलेटीक्स चॅम्पीयनशीप स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान च्या विद्यार्थ्यानी १२ स्वर्ण, १४ रजत व १६ कास्य पदक पटकावित घव घवीत यश संपादन केले.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रसंत तुकोडो जी महाराज विद्यापीठ मैदान नागपुर येथे नागपुर जिल्हा अॅथलेटीक्स असोशि एसन अंतर्गत आयोजित सब ज्युनिअर अॅथलेटीक्स चॅम्पीयनशीप स्पर्धेत बीके सीपी स्कुल कन्हान च्या १० वर्ष मुले, मुली वयोगटात तिस-या क्रमाकांचे चॅम्पी यनशीप तसेच १२ वर्ष मुले, मुली वयोग टात प्रथम क्रमाकांचे चॅम्पीयनशिप पारि तोषिक प्राप्त करित घवघवीत यश संपादन करून १२ स्वर्ण, १४ रजत व १६ कास्य पदक पटकाविल्याने बी के सी पी स्कुलचे संचालक अघ्यक्ष मा. राजीव खंडेलवाल, सचिव पुष्पा गरोला, मुख्याध्यापिका (माध्य) कविता नाथ, मुख्याघ्यापिका (प्राथ.) ज्युलीयाना राव, विनयकुमार वैद्य सर, युनिश कादरी व सर्व शिक्षकवृंदानी व कर्मचा-यांनी क्रिडा शिक्षक अमित ठाकुर, सविता वानखेडे आणि विद्यार्थी खेडाळुंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.