
Oplus_16908288
नागपूर : राज्याच्या उपराजधानी नागपुरात यंदाही बाप्पांच्या आगमनाने शहर उजळून निघाले आहे. २७ ऑगस्ट रोजी गणरायांचे मोठ्या थाटामाटात स्वागत झाले असून, प्रत्येक गल्लीबोळात भक्तीचा माहोल अनुभवायला मिळतोय. शहरातील विविध मंडळांनी उभारलेले आकर्षक पंडाल, झगमगाट करणारे लाईटिंग शो, अनोख्या थीम्स आणि सामाजिक संदेशांनी भरलेले देखावे हे सगळं नागपूरकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे असेल, तर या टॉप १० गणपती पंडालना नक्की भेट द्या—
नागपूरचे टॉप १० गणपती पंडाल –
- मानचा राजा – त्रिमूर्ती नगर
- प्रताप नगरचा राजा – प्रताप नगर
- आदियोगी थीम – भांडे लेआऊट
- व्हीआयपीएलचा राजा – आयटी पार्क
- महाकुंभ थीम – बजाज नगर
- महालचा राजा – महाल
- धरमपेठ
- धरमपेठचा राजा
- डिस्ने लँड थीम – जरीपटका
- जगन्नाथ थीम – भारत क्रीडा मंडळ, महाल
का खास आहेत हे पंडाल?
- काही पंडाल ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा जपतात.
- काहींनी आधुनिकता आणि तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.
- तर अनेक मंडळं सामाजिक संदेश देणाऱ्या अनोख्या थीम साकारत आहेत.
गणेशोत्सव हा फक्त श्रद्धेचा नाही, तर ऐक्य, उत्साह आणि संस्कृतीचा उत्सव आहे. त्यामुळे या पंडालना भेट दिल्याशिवाय नागपूरचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने अपूर्णच राहील.
Oplus_16908288