Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी काही भागात आज वीज नाही

Advertisement

नागपूर,: शहरातील विविध भागांत आवश्यक देखभाल व दुरुस्ती आणि उच्चदाब वीजवाहिनीचे भूमिगत केबल जोडणी आणि रोहित्र उभारणीच्या कामासाठी बुधवार, २५ जून रोजी काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नियमित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे कॉग्रेसनगर विभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत ११ केव्ही वायरलेस वीजवाहिनीवरील छत्रपती नगर परिसर, हनुमान मंदिर (वर्धा रोड), प्रगती कॉलनी, साहस क्रिकेट क्लब, अनुसया कॉम्प्लेक्स. सकाळी १० ते १२ या वेळेत ११ केव्ही इटर्निटी मॉल वीजवाहिनीवरील इटर्निटी मॉल, एनआयटी कॉम्प्लेक्स, महाराजबाग १ आणि २. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही सुभाषनगर वीजवाहिनीवरील सुभाष नगर, शास्त्री लेआउट, हिंगणा रोड, नाईक लेआउट, नेल्को सोसायटी, विवेका हॉस्पिटल, कामगार कॉलनी, तुकडोजी नगर, पटेल लेआउट. सकाळी ८ ते ११ या वेळेत ११ केव्ही प्रसादनगर वीजवाहिनीवरील आनंद नगर, जयताळा बाजार चौक, राही सभागृह, प्रसादनगर, यशोदा नगर, टाकळी सिम, जलतरण सोसायटी, रेणुका सोसायटी. सकाळी ८ ते ११ या वेळेत ११ केव्ही कचोरे पाटील वीजवाहिनीवरील राजाराम नगर, चिखले लेआउट, खापरी नाका, ग्रीन लॉन, अण्णाभाऊ साठे नगर, राय एम्पलोरियल, पायनियर. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही भवन्स वीजवाहिनीवरील सेक्टर ३४ व ३५.सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत: ११ केव्ही समाज मंदिर वीजवाहिनीवरील सेक्टर ३६ व ३७. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही लंडन स्ट्रीट वीजवाहिनीवरील देवीप्रभा परिसर. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही नवनिर्माण २ वीजवाहिनीवरील संभाजी चौक, पडोळे चौक, राधे मंगलम, नवनिर्माण समाज, आधुनिक समाज, चौधरी अपार्टमेंट. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही खामला वीजवाहिनीवरील सिंधी कॉलनी, नेल्को सोसायटी, शांतिनिकेतन, प्रताप नगर, शिव नगर. सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत ११ केव्ही तेलंगखेडी वीजवाहिनीवरील तेलंगखेडी, मरारटोली, रामनगरचा काही भाग, अमरावती रोडचा काही भाग, रामनगर ते रविनगर रस्ता, राममंदिराच्या आजूबाजूचा परिसर या भागातील वीजपुरवठा गंद राहील

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाल विभागात सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ११ केव्ही शेषनगर वाहिनीवरील शेष नगर, शक्ती माता नगर, डायमंड नगर, खरबी चौक.सकाळी ९ ते दुपारी १: या वेळेत ११ केव्ही बिग बाजार वाहिनीवरील गरोबा मैदान, छाप्रु नगर, जगजीवन रामनगर, आंबेडकर गार्डन, बाबुळबन, सीए रोड. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ११ केव्ही इंडस्ट्रीयल वीजवाहिनीवरील देशपांडे लेआउट, डे टू डॅ, त्रिमूर्ती नगर, प्रजापती नगर, शैलेश नगर, कोहिनूर लॉन. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत ११ केव्ही शारदा चौक वीजवाहिनीवरील जुना सुभेदार, शारदा चौक, ज्वार नगर, रघुजी नगर, चक्रधर नगर, अयोध्या नगर.सकाळी ८ ते १२ या वेळेत ११ केव्ही हुडकेश्वर अर्बन या वीजवाहिनीवरील हुडकेश्वर रोड, हुडकेश्वर, म्हाळगी नगर, सेनापती नगर, संजय गांधी नगर, बांते नगर, सन्मान नगर, भोळे नगर, अन्नपूर्णा नगर, वैष्णोदेवी नगर, कॉर्पोरेशन कॉलनी. सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत ११ केव्ही ग्रेट नाग रोड वीजवाहिनीवरील करबला, आशीर्वाद टॉकीज, बैद्यनाथ चौक ते अशोक चौक, रजत संकुल २, चांदणी रोशनी. सकाळी ८ ते ११ या वेळेत सुभाष रोड वीजवाहिनीवरील गणेशपेठ, गांधी सागर तलाव परिसर, टिळक पुतळा परिसर, गाडीखाना परिसरात उच्चदाब वीजवाहिनीचे भूमिगत केबल जोडणी आणि रोहित्र उभारणीच्या कामासाठी विज पुरवठा बंद राहील.

गांधीबाग विभागात सकाळी ८ ते ११ या वेळेत ११ केव्ही एपीएमसी वीजवाहिनीवरील एपीएमसी औद्योगिक परिसर, भारत नगर या भागातील वीजपुरवठा बंद राहील याशिवाय सिव्हील लाईन्स विभागात 11 केव्ही क्लार्क टाऊन 2 वीज वाहीनीवरील क्लार्क टाऊन, लुंबिनीनगर या भागातील वीजपुरवठा सकाळी 7 ते 10 या वेळेत तर 11 केव्ही उत्कर्षनगर वीज वाहिनीवरील उत्कर्ष नगर, नर्मदा कॉलनी, फ्रेंड्स कॉलनी, म्हाडा कॉलनी, वास्तुशिल्प कॉलनी, सचिन सोसायटी, वेलकम सोसायटी, फ़ाळके ले-आउट, कोलबास्वामी, नेताजी सोसायटी या बागातील वीजपुरवठा सकाळी 10 ते 12 या वेळेत बंद राहील

महावितरणने नागरिकांना या वेळेत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सहकार्याबद्दल महावितरण आभारी आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement