Published On : Wed, Jun 25th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांची ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; ७१४ किलो अमली पदार्थ नष्ट

Advertisement

नागपूर : नागपूर शहरात ‘ड्रग्स फ्री नागपूर’ संकल्पनेअंतर्गत आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं. पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून प्रेरित ‘ऑपरेशन थंडर’ (Operation Thunder) अंतर्गत आणि २६ जून आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी ७१४ किलो २३० ग्रॅम इतक्या अमली पदार्थांचा नाश केला.

या कारवाईत गांजा, मेफेड्रोन, चरस, डोडा पावडर यांसारख्या जीवघेण्या नशेच्या पदार्थांचा समावेश होता. ही अमली द्रव्य MPCB (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ) अधिकृत महाराष्ट्र एन्व्हायरो लिमिटेड, बुटीबोरी (MIDC परिसर) येथे MPCB च्या मार्गदर्शक तत्वांनुसार नष्ट करण्यात आली.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत ५४ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या एकूण अमली पदार्थांचे अंदाजे मूल्य ₹१.३२ कोटी इतकं आहे.

या कार्यक्रमास अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) अश्विनी पाटील, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक महादेव भारसाकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, एन्व्हायरो कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मस्के, अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.

विशेष म्हणजे या नशा नष्ट प्रक्रियेला शहरातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे समाजावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले आणि प्रत्यक्ष नष्टिकरण प्रक्रियाही दाखवण्यात आली.

नागपूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला असून, ‘ड्रग्स फ्री नागपूर’ च्या दिशेने एक ठोस पाऊल उचलल्याचे चित्र दिसून आलं आहे.

Advertisement
Advertisement