Published On : Thu, May 28th, 2015

माझ्या चांगल्या कर्माचे फळ मला आज मिळाले- शेठ नानजीभाई ठक्कर

उपमहापौर कक्षात थोर महापुरुषांच्या एकत्रीक तैलचित्राचे अनावरण शेठ नानजीभाई ठक्कर द्वारा संपन्न

Mahapurush Anawaran photos News photo 28 May 2015
नागपूर। ग्रामपंचायती पासुन ते राष्ट्रपती भवन पर्यंतचा प्रवास मी केला पण आज नागपूर महानगरपालिकेने माझा जो सन्मान केला त्याने मी भारावून गेलो. माझ्या चांगल्या कर्माचे फळ आज मिळाले अशी भावना शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठक्कर ठाणावाला ने म.न.पा. केद्रीय कार्यालयतील उपमहापौर कक्षात काल २८ मे २०१५ ला दुपारी २.०० वाजता स्वातंत्रांच्या आंदोलनात विरगती प्राप्त थोर महापुरुषांच्या एकत्रीक तैलचित्राचे अनावरण प्रसंगी व्यक्त केले.

माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या प्रेरणेतून उपमहापौर कक्षात बाळ लोकमान्य गंगाधर टिळक, दादाभाई नैरोजी, लालबहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस, राष्ट्रपिता महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, मंगल पांडे, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई यांच्या एकत्रित तैलचित्राचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक दानसुर शेठ नानजीभाई खिमाजीभाई ठक्कर ठाणावाला (ठाणे) यांच्या शुभहस्ते उपमहापौर पोकुलवार, आमदार प्रा. अनिल सोले, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ सदस्य सुनील अग्रवाल, सहा. आयुक्त राजेश कराडे, सुरेश दांडेकर, दीपक कारिया, प्रमिला गौर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.

“जय भगवान” या नावाने संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात प्रसिद्ध समाजसेवी दानशूर शेठ नानजीभाई ठक्कर या प्रसंगी बोलताना पुढे म्हणाले कि, नागपूर महानगरपालिका हे एक मंदिर आहे. येथे लोकांच्या विकासाची कामे होत असतात. त्याचप्रमाने आपल्या घरालासुद्धा मंदिराप्रमाणे बनविण्याचा प्रयत्न करा. ज्या थोर महापुरुषानी स्वातंत्राच्या आंदोलनात आपले स्वताचे बलिदान दिले अश्या थोर महापुरुषांच्या छायाचित्राचे अनावरण माझ्या हस्ते होत आहे हि माझ्या करिता अभिमानास्पद बाब असून नागऱिकांनी या थोर महापुरुषांची आठवण जरूर ठेवली पाहिजे आणि त्यांचे स्मरण सुद्धा करायला हवे. मला व्यापार करायचा नसून मला लोकांची मदत करण्यात जास्त आनंद प्राप्त होत असतो. याकरिता चांगले कर्म केल्याने त्याचे फळ सुद्धा चांगले मिळत असते. अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

या छोटेखानी कार्यक्रमात भावना व्यक्त करतांना आमदार प्रा. अनिल सोले म्हणाले कि, ज्या थोर महापुरुषांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात आपल्या प्राणाची आहुती दिली. अश्या महापुरुषांचे एकत्रित छायाचित्र मनपा च्या दालनात लावल्याने स्वराज्याला सुराज्यमध्ये परिवर्तीत करण्याचा प्रयत्न करू. उपमहापौर पोकुलवार या प्रसंगी भावना व्यक्त करतांना म्हणाले कि, माझ्या दालनात माजी महापौर अटलबहादूर सिंग यांच्या प्रेरणेतून थोर महापुरुषांच्या एकत्रीत छायाचित्राचे अनावरण “जय भगवान” या नावाने संपूर्ण महाराष्ट्रत प्रसिद्ध शेठ नानजीभाई ठक्कर यांच्या हस्ते संपन्न झाले हा एक योगा-योग असून हि माझ्याकरिता गौरवास्पद बाब असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रसिद्ध समाजसेवी दानशूर शेठ नानजीभाई ठक्कर यांचा मनपाच्या वतीने उपमहापौर पोकुलवार आणि आमदार प्रा. अनिल सोले यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ, तुशीचे रोपटे आणि स्मृतीचिन्ह देवून स्नेहील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर ने केले तर आभार प्रदर्शन क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती हरीश दिकोंडवार यांनी केले. कार्यक्रमाला गोपाल अग्रवाल, राजू कोटरीवार, दिलीपसिंह चव्हाण, वरून मेहाडीया, संजय जीवने, गणेश माकर्डे, योगेश बघेल, अमर घुमले, बाबा चौरसिया, किशोर खेरडे, जगदीश अग्रवाल आदी उपस्थित थे.