Published On : Thu, May 28th, 2015

नागपुरात स्पोर्ट अथारिटी ऑफ इंडियाचे प्रादेशिक केंद्र उभारण्याचे दृष्टी ने केंद्रीय चमुद्वारा पाहणी व बैठक संपन्न

Sport Meeting News photo 28 May 2015
नागपूर। नागपुरात भारतीय क्रीडा प्राधिकरण चे प्रादेशिक केंद्र व राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था उभारण्याचे दृष्टी ने भारतीय क्रीडा प्राधिकरणचे चमूने आज सकाळी वाठोडा व तरोडी खुर्दची पाहणी केली. यामध्ये नेहरू युवा केंद्र व युवक कल्याण मंत्रालायचा सदस्या राणी त्रिवेदी, भारतीय खेळ प्राधिकरण (एस.ए. आय) कांदिवली ची संचालिका सुश्मिता आर. जोतशी, सहसचिव प्रमोद चांदुरकर, ह.व्या.प्र.मं अमरावतीचे डॉ. के.के. देबनाथ मनपा चे स्थावर अधिकारी डी. डी. जांभुळकर, कार्य अभियंता (प्रकल्प) महेश गुप्ता आदी उपस्थित थे.

त्यानंतर केंद्रीय कार्यालयातील नवीन प्रशासकीय सभागृह मध्ये महापौर प्रवीण दटके यांच्या समवेत झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, मनपा आयुक्त आणि नासुप्र सभापती श्याम वर्धने, परिवहन समिती सभापती बंडू राउत, अति उपायुक्त जयंत दांडेगावकर, अधिक्षक अभियंता शशिकांत हस्तक यांचेशी वरील चमूने चर्चा केली.

यावेळी महापौरांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नेतृत्वात याबाबत समिती तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रस्तावित योजनेसाठी जागेच्या आरक्षणाचे बदलला मनपा ने १९/०३/२०१५ च्या महासभेत मंजुरी दिली असून त्याबाबत ०६/०५/२०१५ ला अधीसूचना काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. नियोजित क्रीडा प्राधिकरण चे केंद्रासाठी एकूण १४२ एकर जागा देण्याचे प्रस्तावित असून त्यासोबतच कौशल्य व विकास आणि व्यवस्थापन केंद्राकरिता १०४ एकर जागा देण्याचे प्रस्तावित आहे.

केंद्रीय चमूने जागेबद्ल समाधान व्यक्त करून प्रस्थावित क्रीडा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचे दृष्टी ने अनुकुलता दर्शवली. महापौरांनी प्रस्तावित प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेऊन पाठपुरवठा करण्यात येईल असे सांगितले.