Published On : Fri, May 21st, 2021

आज गज्जु यादव यांचा गांधी पुतळा, व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे उपोषण

पारशिवनी :- माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी आज (२१ मे) त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिल्हा ग्रामिण काग्रेंस कमेटी महासचिव गज्जु यादव यांचा गांधी पुतळा, व्हेरायटी चौक सीताबर्डी येथे रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध मागण्या साठी उपोषण.करत आहेत .

रामटेक विधानसभा क्षेत्रातील गोरगरिब जनतेला अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्या, या मागणीसाठी माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या आज पुण्यतिथीदिनी (२१ मे) त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गांधी पुतळा, व्हेरायटी चौक सीताबर्डी, नागपूर येथे लोकशाही पद्धतीने रितसर अर्ज केल्यावर उपोषण आंदोलनाला परवानगी मिळो अथवा न मिळो जनसामान्यांच्या न्याय, हक्कासाठी लोकशाही मार्गाने नियोजित बेमुदत उपोषण आंदोलन होणारच असल्याची माहिती नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी (ग्रा.)चे महासचिव उदयसिंग उर्फ गज्जू यादव यांनी दिली.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाकडून व आरोग्य विभागाकडून अंमलबजावणी होत नाही. यामागे काही राजकारणी मंडळी यांची पूर्वाग्रह दूषित मानसिकता व द्वेषपूर्ण राजकारण आहे. पालकमंत्री आमच्या निवेदनावर कार्यवाही करण्याचे निर्देश देतात. परंतु, पक्षांतर्गत गटबाजी व त्रिशंकू सरकारमधील सदस्य आमची मागणी पूर्ण नाही व्हावी, याकरिता अधिकार्‍यांवर दबाव टाकत असावे. त्यामुळे ग्रामीण भागातील काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहे. आजच्या घडीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. जिल्हा परिषदेचा अख्खा आरोग्य विभाग झोपुन असल्यामुळे अख्खा कारभार आरोग्य उपसंचालक नागपूर, जिल्हा शल्य चिकित्सक नागपूर व जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्यासारखे बेजवाबदार अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सुरू असताना ग्रामीणमध्ये लोकं उपचाराअभावी मरत असताना कुठल्याही उपाययोजना नाही.

२२ लाख लोकसंख्येसाठी केवळ ९४ व्हेंटिलेटर, लोकसंख्येच्या १ टक्काही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. ग्रामीण भागात काँग्रेसचे प्रस्थ असतानाही लोकांना उपचार मिळत नाही आहे. जिल्ह्याचे प्रशासन, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, वरिष्ठ नेते मंडळी यांच्याकडे ग्रामीण जनतेसाठी वेळच नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हावासीयांच्या न्याय, हक्कासाठी आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचे गज्जू यादव यांनी सांगितले.

रामटेक विधासभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील परिस्थिती अतिशय बिकट होत आहे. प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नाही. तिसरी लाट येण्याच्या वाटेवर आहे. या लाटेत लहान मुलांकरिता काय उपाययोजना आखली गेली आहे. काही नियोजन नाही. कोणी ऐकत नसल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणावर श्री गज्जू यादव, राजा तिडके, जि. प. सदस्य शालिनी देशमुख, योगेश देशमुख, सरपंच शाहिस्ता पठान, डॉ. सुधीर नाखले, निकेश भोयर, चाचेरचे सरपंच महेश कलारे, खंडाळाचे उपसरपंच संकेत झाडे आदी कार्यकर्ते बसणार असल्याची माहिती श्री गज्जु यादव यांनी दिली.