Published On : Tue, Sep 1st, 2020

जिल्हयात आज 13 कोरोनामुक्त तर 16 नविन कोरोना बाधित

गडचिरोली: जिल्हयात आज 13 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. गडचिरोली येथील 03, चामोर्शी येथील 05, आरमोरी येथील 03, सिरोंचा येथील 01 आणि अहेरी येथील 01 असे एकूण 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर 16 नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील 6 जणांचा समावेश असून 01 गुलमोहर कॉलोनी येथील रहिवासी, 01 नवेगाव येथील, 01 कलेक्टर कॉलोनी आणि 03 जण सामान्य रुग्णालयातील आहेत. तर चामोर्शी येथील 08 जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यामध्ये 04 चामोर्शी पोलीस ठाण्यातील, 3 जण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत. 1 जण रेखेगांव आष्टी येथील आहे. अहेरी येथील मंचेरीयाल येथून आलेला 1, वडसा येथील 1 सीआरपीएफ जवान, 02 जण कुरखेडा येथील असून ते रामगड येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले होते.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 292 झाली असून एकुण बाधित संख्या 1179 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 886 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.