Published On : Sat, Jul 13th, 2019

विद्यासागर कला महाविद्यालयात तंबाखु व्यसनमुक्ती

सामुहिक शपथसमारंभ संपन्न

रामटेक: “व्यसन कोणत्याही प्रकारचे ते मानवी जीवनावर घातक परिणाम करणारे असून अकाली मृत्यूला जबाबदार असते.आणि व्यसनांचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त प्रमाणात असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहायला पाहिजे.व्यसनमुक्त जीवन जगले पाहिजे,” असे विचार प्राचार्य डॉ पी .के.यु पिल्लई यांनी
विद्यासागर कला महाविद्यालय खैरी(बी.) रामटेक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तंबाखू व्यसनमुक्तीसाठी सामुहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काढले.देशात दरवर्षी27000 लोक हे तंबाखू सेवनाने मृत्यूमुखी पडत असतात. या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी, प्रचार
प्रसार करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न केले जातात.

विद्यासागर कला महाविद्यालयात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी प्राचार्य डॉ पी. के. ऊ . पिल्लई यांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात सामुहिक शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयातिल सर्व शिक्षकगण ,शिक्षककेत्तर कर्मचारी, विद्याथी या सर्वांनी शपथ घेऊन तंबाखू सेवणापासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली.