Published On : Sat, May 15th, 2021

विद्यापीठ आणि माहाविद्यालयाद्वारे आकारल्या जाणार्यां अनावश्यक शुल्कांबाबात केंद्रिय मंत्री नितिन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे..!

Advertisement

आज भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. काल याच विषयावर भाजपातर्फे रातुम नागपुर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजय दुधे यांना देखील निवेदन देण्यात आले होते.

निवेदनात प्रामुख्याने माहाविद्यालयीन परिक्षा शुल्क कोविड काळात माफ करण्यात यावे तसेच माहाविद्यालय जे पुर्णकालिन मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात आहेत जेव्हा की वाचनालय, कंप्युटर लॅब व इतर गोष्ठींता जेव्हा उपयोग होत नाही आहे तेव्हा ते शुल्क कमी करण्यात यावे असे निर्देश विद्यापीठाने माहाविद्यालयांना द्यावे व विद्यापीठातील विद्यार्थांच्या निशुल्क विमा काढावा अश्या प्रकारच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.


या सर्व मागण्यांची महिती नितनजींना आणि देवेंद्रजींना देत आपण यामध्ये लक्ष देऊन विद्यार्थांना दिलासा मिळऊन द्यावा ही विनंती यावेळेस करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने शिक्षण मंचाच्या अध्यक्षा कल्पना पांडे, माजी माहापौर संदिप जोशी, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे, रातुम विद्यापीठ व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य विष्णु चांगदे, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र पटले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश रहाटे, संकेत कुकडे, विद्यार्थी प्रतिनिधी वरूण गजभिये, इशान जैन उपस्थित होते.