Published On : Tue, Apr 27th, 2021

राज्यातील ऑक्सिजननिर्मिती वाढविण्यासाठी ऊर्जामंत्री यांचा पुढाकार

Advertisement

ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीजजोडभार,उद्यापासून मिळणार १० ते १५ टन प्राणवायू


मुंबई – महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या पोलाद निर्मिती करणाऱ्या कंपनीने आपल्या कारखान्यात रोज १० ते १५ टन ऑक्सिजन निर्मितीसाठी विजेचा जोडभार वाढवून मागितल्यानंतर अवघ्या २४ तासात तो मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची विक्रमी कामगिरी डॉ. राऊत यांच्या सक्रिय देखरेखीखाली पूर्ण झाली आहे।

वर्षांनुवर्षे लोखंडासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद येथील ‘सोना अलॉयज्’ या उद्योगाने साताऱ्यासह महाराष्ट्राला प्राणवायूची संजीवनी देण्यासाठी ‘ऑक्सीजन’ निर्मितीला सुरवात केली आहे. गेली काही महिने हा उद्योग अडचणीत असल्याने त्याने आपला विजेचा जोडभार कमी केला होता. मात्र आज राज्याला ‘ऑक्सिजन’ची नितांत गरज असल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उद्योगांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढे येण्याचे आवाहन करून त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘सोना अलॉयजने त्यांच्या कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून अतिरिक्त किमान १५ टन ऑक्सिजन निर्मिती करण्याची तयारी दाखविली. यासाठी ८०० केव्हिएचा भार वाढवून मागितला.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या माध्यमातून हा विषय समोर येताच डॉ.राऊत यांनी यास तात्काळ मंजुरी दिली. ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना तात्काळ मदत करण्याच्या व त्यांची प्रक्रिया विनाविलंब करण्याच्या सक्त सूचना ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यापूर्वीच घेतलेल्या बैठकांमध्ये दिल्या आहेत.

२४ तासांत अतिरिक्त जोडभार मिळाला- राऊत

“जिल्हाधिकारी व महावितरण वरिष्ठ प्रशासन यांचे प्रयत्नांतून २४ तासांमध्ये अतिरिक्त ८०० केव्हीए इतका जोडभार जोडून मिळाला. ऑक्सिजनची गरज पाहता प्रकल्पाची तातडीने चाचणी घेऊन उत्पादन सुरू करत आहोत”-प्रदीप राऊत,वरिष्ठ महाव्यवस्थापक,सोना अलॉयज्

Advertisement
Advertisement