Published On : Thu, Apr 2nd, 2020

कोरोनाग्रस्त सहाय्यता निधीसाठी विविध संघटनेतर्फे 10 लाखाचा धनादेश

नागपूर : लॉकडाऊनमुळे संकटात सापळलेले असंघटीत कामगार व गरजू व्यक्तींना मदत म्हणून स्वतंत्र मजदूर युनियन, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मागासवर्गीय वरिष्ठ अभियंता व अधिकारी संघटना व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी कल्याण निधी मंडळ यांच्यातर्फे प्रत्येकी अडीच लाख याप्रमाणे 10 लाखाचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिला.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे.एस. पाटील, प्रसिध्द सचिव एन.बी. जरोन्दे, धर्मेश फुसाटे व वाय.डी. मेश्राम यावेळी उपस्थित होते.