
File Pic
वर्धा: शेतीचे काम करीत असलेल्या युवा शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात युवक शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना सेलू तालुक्यातील आमगाव (जं) येथील शेतशिवारात १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
चेतन दादाराव खोब्रागडे (२२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो स्वतःच्या आमगाव (जं) येथील शेतात शेतीचे काम करीत असता कडब्याच्या गंजीत लपून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात युवक जागीच ठार झाला. घटनेची माहिती सेलु पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. परंतु वनविभागाचा एक ही अधिकारी उशिरापर्यंत न पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी जोपर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी येत नाही तो पर्यंत मृतकाच्या शवाला उचलू देणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे घटनास्थळी तनावाचे वातावरण निर्माण झालेले होते.
Advertisement

Advertisement
Advertisement