Published On : Wed, Jan 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

टिकल यादव ला सुवर्ण पदक खासदार क्रीडा महोत्सव बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये १०५ किलो वजनगटामध्ये टिकल यादव ने सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. संत सतनामी महाराज समाज भवन मिनी मातानगर कळमना येथे ही स्पर्धा पार पडली.

स्पर्धेत १०५ किलो वजनगटामध्ये प्रशांत मालपुरी ने रौप्य आणि प्रथमेश बोबले ने कांस्य पदक पटकाविले. ९३ किलो वजनगटामध्ये शुभम गडपाले ने सुवर्ण, सैय्यद आरिफ अली ने रौप्य आणि मोहम्मद अंसार ने कांस्य पदक पटकाविले. ८३ किलो वजनगटामध्ये लाझरेस इमॅन्यूअल, जयंत वरंभे आणि सौरभ गुप्ता यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले. ७४ किलो वजनगटामध्ये अमित येरगुडे ने सुवर्ण पदक, सरफराज शेख ने रौप्य पदक आणि आयुष राजपूत ने कांस्य पदक पटकाविण्याची कामगिरी केली.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्पर्धेतील विजेत्यांना माजी नगरसेवक प्रदीप पोहाणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विदर्भ ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव डॉ. श्रीकांत वरणकर, खासदार महोत्सव समितीचे सहसंयोजक सचिन माथने, अनुज कोसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौरभ रंगारी यांनी केले व आभार चंद्रशेखर धबाले यांनी मानले

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.