Published On : Thu, Jan 2nd, 2020

नागपुरात गारा, पाऊस आणि थंडीची महाआघाडी; विदर्भात गारपीट

Advertisement

नागपूर: गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या गडगडाटी मुसळधार पावसासह गारा आणि हाडे चिरून टाकणाऱ्या थंडीने केलेल्या महाआघाडीने शहरासह विदर्भात हाहाकार उडवला आहे. कापूस, तूर, चणा ही पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट वाढले आहे.

गुरुवारी मध्यरात्रीपासून नागपूर शहरासह विदर्भातील यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात अखंड वृष्टी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अकोलाबाजार येथे सगळा कापूस ओला झाला आहे. बिजोरा भागात पडलेल्या गारांमुळे शेतीचे अनोतान नुकसान झाले आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वर्धा जिल्ह्यातील टाकरखेड येथे तूर, चना व कापूस ही पिके आडवी झाली आहेत. मोठ्या बोराएवढ्या आकाराच्या गारांनी अनेक घरांची कौले फोडली तर शेतीचे नासधूस केली आहे. हा पाऊस दिवसभर राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

Advertisement
Advertisement