Published On : Thu, Aug 8th, 2019

अग्रेसर द्वारे गरजू विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Advertisement

नागपूर : नागपुरातील केशव नगर प्रार्थमिक शाळा जगनाडे चौक, नागपूर व नवप्रतिभ प्राथमिक शाळा सिरसपेठ, नागपूर इथे अग्रेसर संस्थेद्वारे गरजू आणि आर्थिक दृष्टया मागास वर्गीय विध्यार्थ्यांना शिक्षणात त्यांची रुची वाढावी म्हणून, ५, ६ व ७ च्या विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यातत आली.

केशव नगर शाळेत शिवम गिरी, मार्गाशी मलमकर, संस्कृती चिकते तसेच नवप्रतिभा शाळेचे युग चंदेल, नूतन गिरनुले व चेतन शाहू यांना शिष्यवृत्ती देणायत आली आणि बाकी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन त्याचे प्रोत्साहन वाढविण्यात आले.

अग्रेसर संस्था हे समाजात शिक्षणासाठी लोकांमध्ये जागृततेसाठी काम करत असते.

केशव नगर शाळेत प्रमुख पाहुणे घुगरे वडापावचे प्रमुख प्रणव घुगरे व शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम उपस्तीती होते तसेच नवप्रतिभा शाळेत मुख्याध्यापक वानखेडे सर व झाडे सर प्रमुख पाहुणे म्हुणुन उपस्तीत होते. संस्थेचे स्वयंसेवक दिपक फुलबांधे,श्रेयस जट्टलवार, साहिल क्षिरसागर, अश्विन बागडे, ऋषिकेश जोशी, स्वप्नील तडस प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेयचा कार्यास अभिनंदन करून शुभेच्छा प्रमुख पाहुन्यांनी दिल्या.