Published On : Thu, Aug 8th, 2019

शासकीय उपजोल्हा रुग्णालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

Advertisement

कामठी : जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 19 वर्षे वयोगटातील किमान 68 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरते तसेच यामुळे बालकांची बौद्धिक , शारीरिक वाढही खुंटते त्यामुळे या जंतुपासून मुले मुक्त होऊन सशक्त व्हावे यासाठी दरवर्षी 8 ऑगस्ट हा राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येतो यानुसार आज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षिका डॉ श्रद्धा भाजीपाले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय जंतनाशक दिन कार्यक्रम राबविण्यात आला असून लहान बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घातल्या तर 65 शाळेतील विद्यार्थ्यांना या जंतनाशक गोळ्या खाऊ घालणार आहेत.

याप्रसंगी बालरोगतज्ञ डॉ संजय वाघमारे यांनी मार्गदर्शनात वक्तव्य केले की जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने मुलांचे रक्तक्षय कमी होतो, मुलांची वाढ होण्यास मदत होते , आरोग्य सुधारते आणि शाळेत मुलांची उपस्थिती वाढते .तसेच बौद्धिक क्षमता वाढते जास्त क्रियाशिल होत असल्याचे सांगितले.तसेच वय 1 ते 19 वर्षाच्या मुलांना जंतनाशक गोळ्या देण्यात येतात .

याप्रसंगी आरोग्य सेवक एन व्ही सावते, एन एम धावडे, सी एम फुलझेले, प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रतिभा कडू, दिलीप अडुळकर, परिसेविका घाईत, वाघमारे, इम्रान शेख, वैशाली उमाळे, कविता शंभरकर आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी