नागपूर: वर्धा रोडवर चालत्या गाडीचे छत उघडून बाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हातात बाटली दाखवून ती बाटली दुभाजकाच्या आत फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या गाडीचा व्हिडिओ वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त अर्चित चांडक यांच्या पर्यंत पोहोचला असता त्यांनी सोनेगाव पोलीस कर्मचाऱ्याला गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सोनेगाव वाहतूक पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे. ही गाडी नागपूर महानगरपालिकेच्या कंत्राटदाराची असल्याचे सांगण्यात येत आहे.
चालकाच्या या गैरकृत्याबद्दल त्याच्यावर करवाई करण्यात आली असून दोन हजार रुपयांचे चालन बजावण्यात आले आहे. सोनेगाव वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास घोडके यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी गाडी ताब्यात घेऊन कार्यालयाच्या आवारात ठेवली आहे. कारवर मागील 5 चालान अद्याप प्रलंबित आहेत.
सोशन मीडियावरील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३१ एकेआर-२९८६ क्रमांकाच्या कारचे छत उघडून दारू पिण्याचा शौक एका व्यक्तीला महागात पडला. या गाडीवर वरील दोन हजार रुपयांसह सुमारे 10 ते 12 हजार रुपयांची थकबाकी आहे.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता ती नागपूर महापालिकेच्या ठेकेदाराची असल्याचे निष्पन्न झाले. गाडीचे चालान भरल्यानंतर वाहतूक पोलिस विभागाकडून पुढील तपासाची कारवाई केली जाईल. ही कार बरीच महाग असल्याचे सांगितले जात आहे.