Published On : Fri, Sep 11th, 2020

युवा रुरल असोसीएशन व समाज विकास संस्थेद्वारे

मनपा कोवीड रुग्णालयासाठी ४०० पीपीई कीटचेवितरण

युवा रुरल असोसीएशन संस्था नागपूर व समाज विकास संस्था, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानेतसेच एच.सीएल तथा ऑक्सफॉम इंडियाच्या सहयोगाने कोरोनासंकटात लढण्यासाठी नागपूर महानगर पालिकायांच्या अधिक्षेत्रातील कोवीड रुग्णालयात ४०० पीपीई कीटचेवितरण करण्यात आले. दोन्ही संस्थेच्या पुढाकारातून पीपीई किट अतिरिक्त आयुक्त श्री.राम जोशी यांच्या सुपूर्द करण्यात आल्या. नागपूर महानगरातील एकूण १० झोन मध्ये प्रत्येकी ४०कीट देण्यात येणार आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी युवा रुरल असोसीएशनचे महासंचालक दत्ता पाटील, समाज विकास संस्था, उस्मानाबादचे प्रकल्प समन्वयक निखील वाघ, एच.सीएल.चेकार्यक्रम अधिकारी पियुष वानखेडे, श्रीमती ज्योती नगरकर, गौरी शास्त्री-देशपांडे उपस्थीत होते.

कोरोना संकटकाळात संस्थेच्या वतीने विदर्भाच्या ग्रामीण भागासह नागपुरातील गरजूवस्त्यांमध्येही राशन कीट, अर्सेनिक औषधे, देण्यात आले. याशिवाय विशेष कामगार रेल्वे गाड्यांचे वहन करणाऱ्या लोकोपायलट विभागाला ४५० फेसशिल्ड, मास्क व अरसेनिक होमीयोपेथी औषधे देण्यात आली. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानासाठी १५० सुरक्षा कीट प्रदान करण्यात आल्या.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागरण, सुरक्षेच्या उपाययोजना व राशन कीट वाटप असे विविध प्रकारची मदत संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. मुख्यतः नागपूर क्षेत्रासह अमरावती, वाशीम, अकोला, भंडारा, औरंगाबाद, बीड, परभणी अशा महाराष्ट्राच्या विविध भागात मदतकार्य सुरू आहे.

Advertisement
Advertisement