Published On : Mon, Jul 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान योजना

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
Advertisement

नागपूर: श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविली जाते. महामंडळाच्या नागपूर जिल्हा कार्यालयात सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी उदिदष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हयातील चांभार, मोची, ढोर व होलार समाजातील बेरोजगार युवक व युवती तसेच होतकरू, गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन ढगे यांनी केले आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महामंडळाच्या अनुदान योजनेतून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत ५० हजार रूपयांपर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी अर्थसहाय दिले जाते. ५० हजार ते ५ लाख रूपयापर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीजभांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्जपुरवठा सवलतीच्या व्याजदराने पुरविण्यात येतो. या योजनेअंतर्गत बँकेन मंजुर केलेल्या कर्ज रकमेपैकी ७५ टक्के रक्कम ही राष्टीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. ५ टक्के रक्कम लाभार्थ्यांनी स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. याव्यतिरीक्त महामंडळाकडून मुदती कर्ज योजना, लघुऋण योजना, महिला समृध्दी योजना, महिला अधिकारीता योजना व शैक्षणिक कर्ज योजना सुरू आहेत.

१) मुदती कर्ज योजना रू. १ लाखापासून ते रू.५ लाखापर्यंत २) लघुऋण योजना रू.५० हजार ने रू. १.४० पर्यंत ३) महिला समृध्दी योजना रु.५०,००० वं रू १.४० पर्यंत व ४) महिला अधिकारीता योजना रू. ५ लाख ५) शैक्षणिक कर्ज योजना देशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू. ३० लाख तर परेदशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.४० लाख अशा ५ योजना वर्ष २०२४-२५ मध्ये सुरू आहेत प्रकल्प रक्कम प्रकल्प रक्कम रू. ५ लाखासाठी ५० हजार अनुदान तर रू १.४० साठी ३१ हजार अनुदान आहे.

बँकेमार्फत तसेच महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, मोची, ढोर व होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज प्रस्ताव ३ प्रतीत महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय आय.टी.आय. समोर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर येथे सादर करावेत.

मुळ कागदपत्रांसह अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ किंवा मध्यस्थामार्फत कागदपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

प्रस्तावासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे –
सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांचेकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटुंबाचा चालु आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, नुकतेच काढलेले छायाचित्र तीन प्रतीत, अर्जदाराना शैक्षणिक दाखला, रेशन कार्ड झेरॉक्स ३ प्रतीत, आधारकार्ड, मतदान कार्ड, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या जागी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं.८अ), लाईट बिल, टॅक्स पावती.

Advertisement
Advertisement
Advertisement