Published On : Thu, Jul 19th, 2018

या जहाजावर लादले गेले होते मुकेश अंबानीच्या एकूण संपत्तीच्या तीन पट किमतीचे सोने

सिओल : दक्षिण कोरियाच्या बचाव चमू ने एका अशा जहाजाचा मलबा समुद्राच्या तळातून शोधून काढला आहे. ज्यामध्ये मुकेश अंबानीच्या एकूण संपत्तीच्या किमतीपेक्षा तीनपट सोने लादलेले होते. 1905 मध्ये जपान आणि रशिया यांच्यात झालेल्या युद्धात हे जहाज जपान्यांच्या हातात पडू नये. यासाठी या जहाजाला समुद्रात बुडविण्यात आले होते. जहाजाचे नाव डिमिस्ट्री डॉसकोई आहे आणि 113 वर्षांनतंर त्याचा शोध लागला आहे. ब्लूमबर्ग यांच्या रिपोर्टनुसार सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती 44.3 बिलियन डॉलर आहे. जेव्हाकि या जहाजावर लादलेल्या सोन्याचे हल्लीचे मूल्य सुमारे 133 बिलियन डॉलर आहे.

हे जहाज शोधल्यानंतर रशियात मोहिम चालविण्यात येत आहे आणि मागणी केली जात आहे कि, संपूर्ण खजिना रशियाला परत मिळाला पाहिजे. या जहाजाला शोधण्यासाठी समुद्री पाणबुडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. अखेर 14 जुलै रोजी दक्षिण कोरियाच्या समुद्र तटावर उल्लेउनगडोजवळ जमीनीपासून 434 मीटर सुमद्राखाली या जहाजाच्या मलब्याचा शोध लागला. शोध घेणा-या चमूने म्हटले आहे कि, मलबा डिमिट्री डोंसकोई जहाजाच आहे. याची पुष्टी करण्याआधी जहाजाच्या मलब्याचा अभ्यास केला होता. जेव्हा पाणबुड्यांच्या चमूने जहाजावर डोंसकोई लिहीलेले बघितले तेव्हा ते आश्वस्त झाले कि, हा तोच खजिना आहे ज्याचा ते शोध घेत होते.

पाणबुड्यांडे म्हणणे आहे कि जहाजाचा खालचा भाग खराब झाला होता. मात्र वरचा डेक अजूनही चांगला आहे. जहाजावर ठेवलेले शस्त्रसुद्धा स्पष्टपणे बघितल्या जाऊ शकतात. यावर लावले गेलेल्या तोफा, मशीन गन्स, एंकर स्टियरिंग व्हील जरी पाण्यामुळे गंजले असतीत. तरी त्यांचा ढाँचा अजूनही मजबूत आहे. समुद्र तळातून या जहाजाला बाहेर काढण्यासाठी चीन, कॅनडा आणि ब्रिटेनच्या कंपन्यांशी बोलणी सुरु आहे. एका अंदाजानुसार जहाजावर 200 टन सोने लादलेले होते.

डॉसकोई जहाजाला 1883 ला लाँच करण्यात आले होते. या जहाचाचा उपयोग भूमध्य सागरात झाला होता. 1904 मध्ये रशियाने हे जहाज जपानकडे लावले होते. 1905 मध्ये जेव्हा समुद्रात या जहाजाला जपानच्या नाविक सेनेने बघितले. तेव्हा या जहाजावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.

यानंतर दोन्ही देशांच्या दरम्यान भयंकर युद्ध झाले. या युद्धाला सुशिमा युद्धाच्या नावाने ओळखल्या जाते. युद्धात रशियाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यात त्यांचे 4500 सैनिक मारल्या गेले. 38 पैकी 21 जहाज बुडाले. जेव्हाकि, डोंसकोई युद्ध क्षेत्रातून पळ काढण्यात यशस्वी झाले. मात्र जपानी सैनिकांनी याला परत घेरले. परत लढाई सुरु झाली. या जहाजावर 60 सदस्य मारले गेले.रशियन्सनी जपान्यांसमोर सरेंडर केले. मात्र रशियन्सनी या जहाजाला जाणून समुद्रात बुडवले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या जहाजाला समुद्र तळाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.