Published On : Thu, Jul 19th, 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन

कन्हान : – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी संताजी नगर कांद्री येथे कन्हान विकास मंचच्या व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले .

शहर विकास मंच च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृति दिनानिमित्य धर्मराज शाळेच्या मागे संताजी नगर कांन्द्री (कन्हान) येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास मा.पुरूषोत्तम वानखेडे यांच्या अध्यक्षेत मंच चे अध्यक्ष वृषभ बावनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा नावे स्थापना झालेल्या महामंडळाला घर-घर लागली असुन भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या महामंडळाच्या सहापैकी चार योजना बंद झाल्या अवघ्या दोनच योजना सुरू आहेत. गेल्या तीन वर्षात महामंडळाला केवळ २४३ लाभार्थी मिळाले आहेत.

त्यामुळे अण्णाभाऊ तुम्हीच वाचवा महामंडळाला असे म्हणण्याची वेळ आली आहे . असे विचार कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष बावनकर हयानी व्यकत केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंच कार्याध्यक्ष चंन्द्रशेखर वंजारी यांनी तर आभार प्रर्दशन मंच सचिव चंदन मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता कन्हान शहर विकास मंचचे महासचिव धर्मेन्द्र गणवीर उपाध्यक्ष माधव वैध, हर्ष पाटील, हरिओम प्रकाश नारायण, अक्षय फुले, गणेश इंगोले, मुकेश शेंडे, अंजिंक्य वानखेडे , विनोद नागरे , सदाशिव पवार, मंगल खडसे आदीने उपस्थित राहुन मोलाचे सहकार्य केले .