कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राणी तलाव मोक्षधाम येथे नागसेन नगर , मोदी पडाव कामठी रहिवासी सिद्धार्थ हुमने यांचा आज झालेल्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या पार्थिवावर करण्यात आलेल्या अंत्यसंस्कार कार्यक्रमादरम्यान मृतकाला अग्नीचा टेंबा लावून अग्नी देत असता मृतदेहावर अंत्यसंस्कार करतेवेळी डिझेल मारीत असता अचानक पार्थिवारील जळत असलेली लाकडाची चिंगारी उडून डिझेलच्या डबकीवर उडाल्याने अचानक डिझेलचा भडका उडाल्याने अंत्ययात्रेत उपस्थित असलेले तीन जण जळून गंभीर जख्मि झाल्याची घटना घडली असता या अंत्ययात्रेत असलेल्या शोकाकुल नागरिकांत सर्वत्र एकच पळापळ सुटली.
तर जळलेल्या तिघांना वाचवीण्यासाठी सहकाऱ्यांनी मदतीची धाव घेतली दरम्यान सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी गंभीर दोन जखमी इसमाचो परिस्थिती अतिशय नाजूक असल्याचे बोलले जाते.
गंभीर जख्मि मध्ये सुधीर डोंगरे वय 45 वर्षे ,दिलीप गजभिये वय60 वर्षे ,तसेच सुधाकर खोब्रागडे वय 50 वर्षे तिन्ही राहणार खलाशी लाईन नागसेन नगर कामठी आहे.यातील जख्मि सुधीर डोंगरे व दिलीप गजभिये उपचारार्थ कामठीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता त्यांची परोस्थिती नाजूक असल्याने नागपूर च्या मेयो इस्पितळात हलविण्यात आले तर जख्मि सुधाकर खोब्रागडे हे कामठी च्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सह पथक यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली असून घट नेची नोंद केली असुन पुढील तपास सुरू आहे.