Published On : Tue, Apr 3rd, 2018

३० लाखांचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार

naxal Maoist
गडचिरोली: गडचिरोली चकमकीत तीन नक्षलवादी ठार झालेत. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. सिरकोंडाच्या जंगलात सी सिक्स्टी कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या कारवाईत हे तीन नक्षलवादी मारले गेले.

सुनिल कुळमेथेवर ३० लाखांचं बक्षीस
नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य आणि ३० लाख रुपये बक्षीस असलेल्या सुनिल कुळमेथेसह त्याची पत्नी स्वरुपा तसेच आणखी एक महीला नक्षलवाद्याला ठार मारण्यात सी सिक्स्टी कमांडोंना यश मिळालंय. सुनिल पंधरा वर्षापासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. अनेक घटनांचा तो सूत्रधार होता.