Published On : Sat, Feb 3rd, 2018

नागपुरातील फुटला तलावात एकाच परिवारातील तिघांची आत्महत्या केलीय

नागपुर:नागपुरातील फुटला तलावात एकाच परिवारातील तिघांची आत्महत्या केलीय, मृतकांमध्ये पती पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मृतक निलेश शिंदे वय ३५, पत्नी रुपाली शिंदे वय ३२ आणि मुलगी नाहली शिंदे वय पाच वर्षे आहे.

नागपुरातील तेलांखाडी हनुमानमंदिर परिसरात राहणाऱ्या शिंदे कुटुंबातील तिघांनी रात्री आत्महत्या केलीय. अंबाझरी पोलिसांना कळल्यानंतर आज सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आलेय.

आत्महत्येचं कारण अद्याप कळलेलं नाही.