Published On : Sun, Jun 10th, 2018

हावडा मेलचे तीन डबे इगतपुरीजवळ घसरले

नाशिक: हावडा मेल इगतपुरी स्थानकाजवळ अपघातग्रस्त झाली आहे. हावडा मेलचे तीन डबे रुळावरून घसरले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी घाव घेतली. दरम्यान, या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त आलेले नाही.

इगतपुरी जवळ 12809 डाऊन मुंबई – हावड़ा मेलचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातामुळे मुंबई-दिल्लीसह उत्तर भारतात जाणारी येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच पंचवटी , राज्यराणी, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वेगवेळ्या रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

दरम्यान बचाव कार्यासाठी मनमाड येथून साहित्य व कामगारांना घेऊन विशेष गाडी इगतपुरीकडे रवाना झाली आहे.