Published On : Thu, Jul 25th, 2019

गांजाविक्री करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारास अटक

स्लग:-1 लक्ष 21 हजार 390 रुपये किमतीचा गांजा जप्त

कामठी:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या दोन गांजाविक्री अड्यावर धाड घालण्यात गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाला यशप्राप्त झाले असून या धाडीतून तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात आले असून या दोन्ही कारवाहितुन 1 लक्ष 21 हजार 390 रुपये किमतीचा 12 किलो 139 ग्राम गांजा जप्त करण्यात आला.अटक आरोपीचे नाव जफर अब्बास बरकत अली वय 32 वर्षे रा आझाद नगर कामठी, जब्बार खान उर्फ तुंडया रहीम खान वय 38 वर्षे रा सराय झोपडपट्टी कामठी, यशवंत उर्फ आशु पवनसिंग ठाकूर वय 20 वर्षे रा.रमानगर कामठी असे आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या इंडियन पेट्रोलपंप जवळील खुर्शीद ऑटो गॅरेजसमोर संशयित असलेल्या आरोपीची अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन 50 हजार रुपये किमतीचा 5 किलो गांजा जप्त करण्यात आला.या आरोपीवर कलम 20 (ब)अंमली पदार्थ विरोधी कायदा 1985 अनव्ये गुन्हानोंद करीत अटक करण्यात आले अटक आरोपीचे नाव जफर अब्बास बरकत अली वय 32 वर्षे आझाद नगर कामठी असे असून हा आरोपी अत्यंत कठोर आणि खुनी वृत्तीचा असून त्याच्यावर 9 अशे गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार कायदा, घरफोडी असे विविध गुन्हे दाखल आहेत त्याला सत्र न्यायालयात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा लागली असून त्याने शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले असून जामिनावर आहे.

तसेच रेल्वे स्टेशन जवळील सराय झोपडपट्टी मध्ये घातलेल्या धाडीत जब्बार खान उर्फ तुंडया रहीम खान वय 38 वर्षे आणि यशवंत ठाकूर वय 20 वर्षे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 71 हजार 390 रुपये किमतीचा 7 किलो 139 ग्राम गांजा जप्त करण्यात आला या दोघावर कायदेशीर गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले. यातील आरोपी जब्बार खान उर्फ तुंडया यांच्यावर एकूण 7 गुन्हे दाखल असून त्यातील 2 अंमली पदार्थाचे गुन्ह्याची नोंद आहे तसेच खून आणि खुनाचा प्रयत्न असेही गुन्हे दाखल आहेत त्यात तो जामिनावर बाहेर आहे तसेच आरोपी यशवंत ठाकूर वर दोन गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये एक शरिराविरुद्ध गंभीर जखम करणे आणि घरफोडीचा गुन्ह्याचा समावेश आहे.

ही यशस्वी कारवाही पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय , सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहाययक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम , सहाययक पोलीस निरीक्षक विजय कसोधन,सहाययक फौजदार विठोबा काळे, अर्जुनसिंग ठाकूर, पोलीस हवालदार दत्ता बागूल, तुलसीदास शुक्ला, प्रदीप पवार, सतिष पाटील, नितीन रांगणे, पोलीस शिपाई, नितीन साळुंखे,नरेश शिंगणे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहव.

संदीप कांबळे कामठी