Published On : Thu, Jan 16th, 2020

साडे तीन लाख विद्यार्थी मानवी साखळी तयार करून देणार ‘स्वच्छतेचा संदेश’

मम्मी पापा यू टू अभियान : शहरभरातील शाळा होणार सहभागी


नागपूर : नागपूर महानगरपालिका, शालेय शिक्षण विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्याच्या उद्देशातून १३ ते १९ जानेवारी दरम्यान सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत ‘मम्मी पापा यू टू’ अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शुक्रवारी (ता. १७) संपूर्ण शहरभरातील शाळांचे सुमारे साडे तीन लाखांवर विद्यार्थी मानवी साखळी तयार करून स्वच्छतेचा संदेश देणार आहेत.

एखाद्या विषयावर जनजागृती करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन मानवी साखळी करण्याची नागपूरच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. लोकांनी स्वच्छतेची सवय लावावी, नागरिकांनी घराप्रमाणे शहरांतील रस्ते, परिसर स्वच्छ ठेवावा, रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा ओला आणि सुका अशा विलग स्वरूपातच द्यावा, वाहतुकीचे नियम पाळावेत, हेल्मेट घालण्याची चांगली सवय लावावी, वाहनांच्या वेगाला आवर घालावा असे संदेश देत विद्यार्थी शहरांतील विविध भागात रस्त्यावर उतरणार आहेत. मानवी साखळी करून, हातात घोषवाक्याचे फलक घेऊन, बँड, लेझीम पथकाच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणार आहेत.

सकाळी ८.३० वाजता झाशी राणी चौकापासून चारही बाजूने सेवासदन शाळा, हडस शाळा, सरस्वती विद्यालय, महाराष्ट्र अध्ययन मंदिर या शाळांचे विद्यार्थी मानवी साखळी करतील. यावेळी महापौर संदीप जोशी, आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहतील. त्यानंतर ते आकाशवाणी चौक येथे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवतील. शितला माता मंदिर ते हसनबाग मार्गावर अभिनंदन हायस्कूल आणि राजेंद्र हायस्कूलचे विद्यार्थी राहतील. रमना मारोती चौकापासून चारही बाजूने ज्योती शाळा, अभंग शाळा, जे.पी. कॉन्व्हेंट,स्वामी गजानन शाळा, श्रीकृष्ण नगर चौकापासून असलेल्या रस्त्यांवर आदर्श संस्कार विद्यालय, विभाताई गांधी शाळांचे विद्यार्थी राहतील. छत्रपती चौक ते मानेवाडा मार्गावर प्रगती हायस्कूल, साऊथ प्वाईंट स्कूल, मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन, श्रीस्कूलचे विद्यार्थी राहतील. डिप्टी सिग्नल चौकात संजय नगर हिंदी माध्यमिक शाळा,मनपा, श्रेयस हायस्कूल, हिंदुस्थान विद्यालय, विनायकराव देशमुख शाळेचे विद्यार्थी राहतील. आकाशवाणी चौकात सेंट उर्सुला शाळा, प्रॉव्हिडन्स गर्ल्स हायस्कूल तर संविधान चौकात सेंट जोसेफ स्कूलचे विद्यार्थी मानवी साखळी तयार करून जनजागृती करतील.

सक्करदरा चौक ते भांडे प्लॉट चौकात विदर्भ बुनियादी हायस्कूल, शारदा महिला विद्यालय, उज्ज्वल उच्च प्राथमिक शाळा, भांडे प्लॉट चौक ते नंदनवन, जगनाडे चौक रस्त्यावर जानकीदवी जायस्वाल हायस्कूल, भगवती गर्ल्स हायस्कूल, नंदनवन मराठी नं. १ शाळा, ज्ञानविकास उच्च प्राथमिक शाळा, जवाहर गुरुकुल उच्च प्राथमिक शाळा, लिटील रोज कॉन्व्हेंट, सोमलवाडा चौकात जनता हायस्कूल वर्धा रोड, द.म. आवारी हायस्कूल, वासंती उच्च प्राथमिक स्कूल, राजीव गांधी चौक, अजनी येथे माऊंट कारमेल गर्ल्स हायस्कूल,ज्युनिअर उच्च प्राथमिक शाळा, सेंट ॲन्थोनी हायस्कूल, रेल्वेमेन्स हायस्कूल, रेल्वे ॲन्थोनी हायस्कूल, जयताळा चौकात सेंट जोसेफ हायस्कूल, यशोदा हायस्कूल, जयताळा माध्यमिक शाळा, जयताळा उच्च प्राथमिक शाळा, त्रिमूर्ती नगर चौकात शेषराव कोहडे विद्यालय, यशोदा स्कूल, यशोदा इंग्लिश स्कूल, जी. एच. रायसोनी विद्यालय, शिवणगाव चौक परिसरात विद्यावर्धिनी हायस्कूल,शिवणगाव माध्यमिक शाळा, ज्ञानपीठ विद्यावर्धिनी उच्च प्राथमिक शाळा मानवी साखळी तयार करतील.

याव्यतिरिक्त चिचभवन चौक, श्रद्धानंदपेठ ते दीक्षाभूमी पचौक, मेडिकल कॉलेज रोड ते अजनी रोड पोलिस स्टेशन, पार्वतीनगर चौक, भगवाननगर चौक, तुकडोजी पुतळा चौक, क्रीडा चौक, मानेवाडा चौ, दिघोरी चौक, म्हाळगी नगर चौक, उदयनगर चौक, टेका नाका चौक, कपिल नगर चौक, कामगारनगर चौक, टिपू सुलतान चौक, यशोधरा पोलिस चौकी, शिवाजी चौक, अरविंद नगर, फारुख नगर चौक, वैशाली नगर चौक, आशीनगर झोन ते कामठी रोड, अशोकनगर चौक, बाळाभाऊपेठ मार्ग, कमाल चौक, कडबी चौक, शुक्रवारी तलाव मार्ग, चिटणीस पार्क, शिवाजी पुतळा चौक, बडकस चौक, कोतवाली चौक, नरसिंग टॉकीज चौक, गांधीबाग चौक, फवारा चौक, हिवरीनगर चौक, वर्धमान चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक, कल्याणेश्वर मंदिर, अग्रसेन चौक, टेलिफोन एक्चेंज चौक ते छापरुनगर चौक, गंगाबाईघाट चौक ते बगडगंज चौक, सतरंजीपुरा चौक, जगनाडे चौक, रेशीमबाग चौक, कांजी हाऊस चौक आदी ठिकाणी चारही बाजूंनी विविध शाळांतील विद्यार्थी मानवी साखळी तयार करतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.