Published On : Mon, Jul 2nd, 2018

वराडा बंद टोल नाक्याजवळच्या खुनातील तीन आरोपींना अटक

Advertisement

कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर कुख्यात गुंड व गोंडेगाव चा उपसरपंच विनोद सोमकुंवर याची पोटावर व गळ्यावर तलवारीने वार करून भरदिवसा हत्या करण्यात आली होती. हे हत्याकांड बिटकाॅईन या आभासी चलन प्रकरणातून झाले असल्याचे समोर आले असून यातील तीन आरोपींना गोंदिया येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्याकांडातील दोन आरोपी अद्यापही फरार आहे.

कन्हान परिसरात असलेल्या कोळसा खाणीतून अवैधरीत्या कोळसा संकलन करण्याचे काम विनोद गेल्या अनेक वर्षांपासून करीत होता. यामुळेच परिसरात कोळसा किंग म्हणून त्याची ओळख झाली होती. यातून तो गुन्हेगारी विश्वातसुध्दा शिरला होता. त्याच्यावर कन्हान पोलीस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने काही दिवसापूर्वी बिटकाॅईन या आभासी चलनाप्रकरणी पोलीसांना टिप देवून निशेद वासनिक याला अटक केली होती. तसेच हा व्यक्ती गावात आल्यावर त्याच्या मागे दोन तीन वेळा तलवार घेऊन धावा बोलला होता. त्यामुळे निशेद वासनिक याच्यात व विनोद सोमकुंवर मध्ये वैरत्व निर्माण झाले होते.

शुक्रवारी (दि.२९ ) दुपारी चार वाजताच्या सुमारास विनोद गोंडेगाव टेकाडी वरून अण्णा मोड डुमरी येथील आपल्या भावाच्या धाब्यावर शिप्ट कार क्र. एम एच ४०- ए आर -२८४१ ने जात होता. विनोदच्या मार्गावर असलेल्या निशेद महादेव वासनिक, नितीन माणिकराव देशमुख, सोनु ऊर्फ बाबा रामु हिरामण वनवे सर्व रा नागपूर व ईतर दोन जणांनी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील वराडा (टेकाडी ) बंद टोल नाका व महामार्ग पोलीस केंद्राच्या समोर विनोद सोमकुंवर यांची शिप्ट कार थांबविली. आरोपींमध्ये अगोदर पासूनच सैतान संचारल्यामुळे शाब्दिक बाचा बाची न करता समोरच्या काचावर तलवारीने वार करून विनोदला बाहेर खेचून पोटावर व गळ्यावर तलवारीने वार करून हत्या केली. याप्रकरणाची कन्हान पोलीसांना माहीती मिळताच थानेदार चंद्रकांत काळे आपल्या पोलीस सहका-यासह घटनास्थळी धाव घेतली होती. हत्याकांडानंतर आरोपी कुठलाही पुरावा न सोडता पसार झाले होते.

या हत्याकांडामुळे अख्खे पोलीस दल हलले. पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे व ठाणेदार चंद्रकांत काळे यांनी गुप्तहेर पेरुन विनोदविषयी माहिती काढली. तसेच संशयित म्हणून चार जणांना ताब्यात घेतले. यात गोंडेगाव येथील तुळशीदास नाईक यांचा जावई निशेद सोबत वितुष्ट असल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नागपूर ग्रामीण पथकाचे पोलीस सहाय्यक निरिक्षक अनिल राऊत, ए एस आय लक्ष्मीकांत दुबे, नाना राऊत, सुरज परमार, निलेश बर्वे, शैलेश यादव, प्रणय बनापार, साहेबराव बहाडे , सत्या कोठारे याच्या पथकाने जाळ टाकत आरोपींचा शोध घेऊन गोंदिया येथुन रात्री एक वाजता आरोपी निशांत वासनिक, नितीन देशमुख, सोनु ऊर्फ बाबा वनवे या तिघांना अटक करून कन्हान पोलीस स्टेशनला आणण्यात आले . या खुनातील आणखी दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे .