Published On : Tue, Aug 7th, 2018

दुकानदार महासंघातर्फे ठाणेदारांचा सहृदय सत्कार

Advertisement

कन्हान : – नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असलेल्या व थकीत गुन्हे निकाली काढण्यारे ठाणेदार चंद्रकांत काळे यांचा कन्हान कांन्द्री दुकानदार महासंघातर्फे आज (दि.७) सहृदय सत्कार करण्यात आला.

कन्हान क्षेत्रात होत असलेल्या अवैध धंदे , हाणामारी , खुन, चोरी इत्यादीवर अंकुश लावून आळा घालण्याचा उत्कृष्ठ काम केले आहे. तसेच अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचा इसमांना जेरबंद करुण हदपार केले. कन्हान क्षेत्रात उत्कृष्ठ कामगीरी बजावत शांतप्रिय कन्हान ठेवण्यास सिंहाचा वाटा उचलला. कन्हान क्षेत्रातील चांगले कार्य , विविध क्षेत्रातील सामाजीक कार्य करणा-या नागरीकांना , महिलांना, युवकांना, शालेय विद्यार्थांना वेळोवेळी सहकार्य, मार्गदर्शन करुन आनंदमयी वातावरणाची निर्मीती केली.

Gold Rate
24 July 2025
Gold 24 KT 99,500 /-
Gold 22 KT 92,500 /-
Silver/Kg 1,15,500 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कन्हान कांद्री दुकानदार महासंघातर्फे शाल श्रीफळ देऊन ठाणेदार काळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कन्हान शहरातील नागरीक व शिक्षकगण मिलींद वानखेडे, खिमेश बढिये यांचाही महाराष्ट्र आदर्श शिक्षक पुरस्कारकरीता नामनिर्देश प्रक्रियेत निवड झाल्याबाबत अभिनंदन करण्यात आले ,याप्रसंगी कन्हान कांन्द्री दुकानदार महासंघाचे सदस्य अकरम कुरैशी, श्यामबाबु पिपलवा, नफीज खान, किशोर बेलसरे, सचिव प्रशांत बाजीराव मसार, सचिन गजभिये , रामदास तडस, प्रदिप गायकवाड, नितीन रंगारी, शिवशंकर हलमारे, राजेश फुलझेले, अरविंद देशमुख, मौर्या सिंग, नथुजी चरडे, श्री खंडेलवाल, बाला खंगारे, वृषभ बावनकर आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.

Advertisement
Advertisement