Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 9th, 2019

  वो चांद खिला…वो तारे हंसे…!

  – नागपूरकरांनी अनुभवली ‘ये रात अजब मतवाली’
  – खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘मैं लता’चे सादरीकरण

  नागपूर: ‘लता जेव्हा गांधार राग गायला माईकपुढे उभी राहते, तेव्हा तिच्याइतकी सौंदर्यवती जगात कोणीही नसते,’ असे ज्यांच्याविषयी अभिमानाने म्हटले जाते त्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त खास त्यांच्या सुमधुर गीतांचा हा नजराणा यंदाच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात सादर करण्यात आला. एकापेक्षा एक सरस, गाजलेली आणि कर्णमधुर गाणी शहरवासियांची सायंकाळ आनंददायी करून गेली. काहींसाठी जुन्या मोहक आठवणी जागवणारा तर काहींना श्रवणानंद देणाèया विभिन्न गाण्यांना जोडणारे सूत्र एकच होते आणि ते म्हणजे गानकोकीळा लतादीदी !

  त्यांच्या सुमधुर गीतांचा हा नजराणा प्रसिद्ध गायिका महालक्ष्मी अय्यर, सुवर्णा माटेगावकर, शरयू दाते आणि गायक प्रशांत नासेरी यांच्या प्रस्तुतीतून साकारला आणि उत्तरोत्तर रंगत गेला. रविवार ८ डिसेंबर रोजीची सायंकाळ खुललेल्या चंद्राची आणि हसणाèया चांदण्याची ठेव घेऊन आली. नागपुरात प्रथमच ३० वादकांसह हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कलाकारांनी ‘आएगा आनेवालाङ्क,‘हवा में उडता जाएङ्क,‘ओ सजना बरखा बहार आयीङ्क,‘होठों पे ऐसी बातङ्क,‘जो वादा किया वो निभानाङ्क,‘इन्ही लोगोनेङ्क आणि ‘देखा एक ख्वाब तोङ्कयासह इतर अनेक रसाळ गाणी तयारीने सादर केली. शिवाय, जुन्या गाण्यांचा, युगलगीत आणि नव्या गाण्यांचा मिडले सादर करून, कलाकारांनी नागपूरकर कानसेनांना तृप्त केले.

  या कार्यक्रमाचे आयोजन पराग माटेगावकर, व्हायोलीनवादक जितू ठाकूर, संगीत संयोजक चिराग पांचाल यांनी केले. तत्पूर्वी, राजेश बागडी, संजय गुप्ता, किर्तीदा अजमेरा, ज्येष्ठ गायिका नंदीनी कुमार, विश्वविक्रमी गायक सुनिल वाघमारे आणि आमदार अनिल सोले यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. कलाकारांचे स्वाग, प्रेरणा गीत झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली.

  लतादीदींच्या अक्षरश: हजारो आणि तुल्यबळ गीतांमधून २५ गाण्यांची निवड हेदेखील सादरकत्र्यांसाठी नक्कीच एक आव्हान ठरले असावे. स्वरसम्राज्ञीच्या ‘वंदे मातरम्ङ्क या ह्रदयस्पर्शी गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. ‘मै लताङ्कचे सादरीकरण खासदार सांस्कृतिक महोत्सवात सोमवार ९ डिसेंबरला भेंडे ले-आऊटच्या मैदानावर तर मंगळवार १० डिसेंबरला हा कार्यक्रम वर्धमान नगरला होणार आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145