नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले तर यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली.
भाजपने छोटे राज्य द्यायचे आणि मोठा राज्य बळकवणे, असा प्रकार सुरु केला आहे. तेलंगाना द्यायचा आणि मध्य प्रदेश घ्यायचा, मग लोकांना सांगायचे ईव्हीएम त्या ठिकाणी नाही का? हा भाजप महायुतीचा विजय नाही तर ईव्हीएमचा विजय दिसत आहे. कोणी कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? यावरही विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
महाराष्ट्रातील नवे सरकार आता शेतकऱ्यांनासाठी काय करते, त्यावर आमचे लक्ष असणार आहे. महागाई, राज्यातील प्रश्न यावर विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू. शेतकरी संकटात आहे. सोयाबीन, कापूस विकला जात नाही. महागाई उच्चांकावर आहे. मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारवर राग असताना अशा प्रकारचा निकाल येत असल्याबद्दल वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली.