Published On : Wed, Mar 4th, 2020

धावत्या रेल्वेत तृतियपंथी पुन्हा सक्रीय!

Advertisement

– आउटर ते आउटर प्रवास, बिदागीच्या नावावर वसुली

नागपूर: सुरक्षा व्यवस्थेनी थोडी जरी उसंत घेतली की तृतियपंथी सक्रिय होतात. आउटरवरून अर्थात स्टेशनपासून अध्र्या ते एक किमी अंतरावरुन तृतियपंथी गाडीत बसतात. आउटर ते आउटर असा प्रवास करतात. आता पुन्हा तृतियपथी सक्रिय झाले असून प्रवाशांकडून वसुली करीत असल्याची माहिती आहे. आउटर ते आउटर प्रवास करीत असल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. दरम्यान आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिस तृतियपंथीयांना पकडण्यासाठी मोहीमेवर आहेत.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तृतियपंथीयांच्या विरोधात आरपीएफने धडक कारवाई सुरू केली होती. दरम्यान अनेकांना त्यांना सळो की पळो करून सोडले. त्याच वेळी लोहमार्ग पोलिसांनीही कंबर कसली. त्यांचेही पथक सक्रिय झाले. दोन्ही सुरक्षा व्यवस्थेनी तृतियपंथीयांचा बंदोबस्त केला होता. मात्र, थोडी उसंत मिळताच तृतियपंथी पुन्हा सक्रिय झालेत.

आउटरवर रेल्वेगाड्यांची गती संथ असते. संधी साधून तृतीयपंथी गाडीत चढतात. समूहाने प्रवेश केल्यानंतर गाडीने वेग धरताच पैशासाठी बळजबरी सुरू होते. पैसे न देणाèयांना शिव्याशाप ही नित्याचीच बाब झाली आहे. असभ्य हावभाव करीत असल्याने महिला वर्गाला लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. पुढील स्थानकावर पोहोचताना गडीचा वेग कमी होताच ते निघून जातात. मासिक पासधारकांसाठी तर डोके दुखी ठरली आहे. गीतांजली एक्‍स्प्रेसमध्ये हा प्रकार नेहमीचाच झाला आहे. अलीकडेच त्यांच्यासोबत तृतीयपंथींनी वाद घातला.

Advertisement

हावडा मार्ग, इतवारीहून भंडारा मार्ग, दिल्ली मार्गावरील इटारसीपर्यंत, मुंबई मार्गावर सेवाग्राम, बडनेरा आणि अकोल्यापर्यंत काही गाड्यांमध्ये तृतीयपंथी दिसून येतात. बिदागीच्या नावावर जबरी वसुली करून प्रवाशांना त्रास देतात. रेल्वेगाडीत आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचे स्कॉटिंग असले, तृतियपंथी आउटर ते आउटर प्रवास करीत असल्याने आणि पळून जात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास कठीण जाते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.