Published On : Sat, Jul 4th, 2020

पशु खाद्य दुकानातुन चोरी करणारा चोरटा चार तासात अटक

,13 हजार 240 रुपये हस्तगत

कामठी : स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शुक्रवारी बाजारातील बंद असलेले अनंत पशु खाद्य भंडार दुकानाच्या सिमेंट छताची सीट फोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील लाकडी काउंटर मधून 10 व 20 रुपयांच्या नोटा असलेले नगदी 15 हजार रुपये चोरी झाल्याची घटना दुपारी 1.51 वाजता घडली असता यासंदर्भात फिर्यादी अतुल इटनकर वय 40 वर्षे रा बजरंग पार्क कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावोरुद्ध गुन्हा नोंदवीत पोलिसानी तपासाला दिलेल्या गतितुन तर्कशक्ती च्या आधारावर गुप्त माहिती च्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे अवघ्या चार तासाच्या आत आरोपीचा शोध लावण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपो चे नाव सचिन उर्फ वांग्या राकेश कुमरे वय 22 वर्षे रा दुर्गा चौक कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या नेतृत्वात डी बी स्कॉड चे किशोर गांजरे, पवन गजभिये, अंकुश गजभिये आदीनो केली असून पुढील तपास सुरू आहे.


संदीप कांबळे कामठी