Published On : Mon, Nov 6th, 2023

समर्पण, सेवेशिवाय दुसरी कमाई नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

कोराडी येथे दिव्यागांना कृत्रिम अवयवांचे वाटप
Advertisement

एखाद्याला सक्षम करण्यात किंवा त्याला त्याच्या पायावर उभा राहण्यास मदत करण्यात मिळणारे जे समाधान आहे, ते कशातही नाही. सेवेशिवाय दुसरी कमाई कोणतिही नाही, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जागतिक विकालांग दिनाच्या निमित्ताने कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात विकलांग बांधवांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, दिव्यांग व अपंग झालेल्या बांधवांना या कृत्रिम अवयवामुळे त्यांच्या जीवनाला गती प्राप्त होणार आहे. त्यांना रोजगाराची संधी पुन्हा एकदा निर्माण होणार आहे आणि पुन्हा एकदा ते पूर्वीप्रमाणे सर्वार्थाने स्वतःच्या पायावर उभा राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रमेश ढगे व शुभम राऊत यांना कृत्रिम पाय, चंद्रकुमार पारधी यांना कर्णयंत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी समित स्पोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक साजीद शेख व आशिष मेरखेड यांच्यासह महेश बोंडे यांनी परिश्रम घेतले.

शुभम राऊत या युवकाच्या पायाला सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान त्याचा पाय कापावा लागला होता. तर रमेश ढगे यांना गॅगरिनमुळे पायाला दुखापत झाली होती. शुभम आणि रमेश यांना कृत्रिम पाय मिळाल्याने त्याच्या दैनंदिन जीवनात अनेक कामे सुकर होणार असल्याची भावना व्यक्त केली व श्री बावनकुळे यांचे आभार व्यक्त केले.