नागपूर: पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वातील युति शासनाच्या सरकारमध्ये कुठलाही फरक वा बदल नाही प्रश्न लांबणीवर टाकणे हीच त्याची कार्य पध्दती आहे. एखादया वाहन चालकाला चांगल्या पद्धतीने वाहन चालविण्याचा सराव असतो तो रस्त्याचे खडडे चुकवून वाहनात बसणाऱ्याला कमी धक्के बसतील त्या पद्धतीने वाहन चालवितो तेवढा एक मात्र फरक राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बाबतीत आहे असे परखड मत विधान परिषदेतील नागपूर विभागीय शिक्षक आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केले.
गाणार आज टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या अंतर्गत नागपूर स्कूल ऑफ जर्नालिझम च्या वृत्त संकलन आणि विश्लेषण ( न्यूज रिपोर्टींग अॅन्ड अॅनलिसीस) या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अतिथी अध्यापक म्हणून मार्गदर्शन करताना झालेल्या प्रथोतांराचे वेळी बोलत होते.व्यासपिठावर अभ्यासक्रमाचे संयोजक विश्वास इंदूरकर उपस्थित होते.
समाजात आज माणूसकीचा पाजर हा पत्रकार आणि न्याय संस्थेमुळे टिकून असल्याचे त्यांनी नमूद करून अनेक धोके पत्करून पत्रकार वृत्त संकलन करतात आणि नेमके काय घडते आहे याची माहिती समाजाला देत असतात तेव्हा त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भातही विचार होणे गरजेचे असल्याचे गाणार यांनी स्पष्ट केले.
समाजाचा आरसा म्हणून ओळखले जाणारे शिक्षक आणि पत्रकार या दोन समूहाला सरकारने एका प्रकारे वा- यावर सोडले असल्याचे गाणार यांनी सांगितले. शिक्षक आणि पत्रकारांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते आदि मुद्यांचा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विस्तृत उहापोह केला. शिक्षण विभाग तर एकूण आठ मंत्रालयात विभागला गेलाआहे. त्यामुळे प्रश्नाची सोडवणूक होत नाही झाली तर प्रंचड विलंब लागतो एका परिपत्रकाला दुसरे जारी केलेल परिपत्रक पूर्णपणे छेद देणारे असने आदि सर्व बाबीची सोडवणूक युध्द पातळीवर झाली तरच शिक्षकांना काही प्रमाणात न्याय मिळू शकेल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
समाजाचे प्रबोधन आणि दिशा देण्याचे कार्य करणारे शिक्षक आणि पत्रकार ही दोन समूह समाधानी असेल तरच ते समाजाचे योग्यरित्या प्रबोधन करू शकतील तेच समस्याग्रस्त असेल तर त्यांचेकडून समाज संवर्धनाची अपेक्षा करणे निरर्थक ठरेल असेही त्यांनी सांगितले. हा मुद्दा त्यांनी अनेक उदारहणे देऊन स्पष्ट केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अभ्यासक्रमाचे संचालक विश्वास इंन्दूरकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी राजेंद्र हर्षवर्धन यांनी गाणार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नो उत्तरानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
