Published On : Wed, Jan 1st, 2020

पारशिवनी गट -२४ व गण-३५ असे एकुण ५९ उमेदवार रिंगणात

कन्हान : – नागपुर जिल्हा परिषद व पचायत समिती निवडणुक येत्या ७ जानेवारी ला होणार असुन पारशिवनी तालुक्यातुन ०४ जिल्हा परिषद गटा करिता २४ व ०८ पंचायत समिती गणा करिता ३५ असे एकुण ५९ उमेदवारांना चुनाव चिन्ह मिळाले असुन तालुक्यातील टेकाडी, गोंडेगाव व माहुली येथील निवडणुक चुरसीची ठरण्याचे संकेत दिसत आहे.

आठ वर्षानंतर होऊ घातल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असुन पारशिवनी तालुक्यातुन नामाकंन दाखल करण्या च्या शेवटच्या दिवसा पर्यंत कॉग्रेस, भाज पा, शिवसेना, प्रहार जनशक्ती, बळीराजा पार्टी, आम आदमी पक्ष, बीआरएसपी व अपक्ष यांचे ०४ जिल्हा परिषद गटा करि ता ४६ पैकी २२ अर्ज मागे घेऊन रिंगणा त २४ उमेदवार व ०८ पंचायत समिती गणाकरिता ५२ पैकी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असुन ३५ रिंगणात असे एकुण ५९ उमेदवारांना चुनाव चिन्ह वाटप करण्यात आले आहे.यात टेकाडी -कांद्री गट अनु. जाती महिला करिता

१) देविया वैशाली ईश्वरदास- धनुष्यबाण ( शिवसेना), २) पानतावने विद्या गणेश – कपबशी (प्रहार), ३) बर्वे रश्मी श्यामकु मार – हात (कॉग्रेस), ४) बर्वे शालीनी लिलाधर- कमळ (भाजप) असे- ४ गोंडेगाव गट सर्वसाधारण करिता १) कारेमोरे व्यकट कवडु – कमळ (भाजप), २)खंडाळ कैलास- गँस सिलेंडर (अपक्ष ) ३)जामदार यशवंत जामदार- घडयाळ (राष्ट्रवादी कॉग्रेस), ४) जिभकाटे विक्की रतीराम- ट्रँक्टर (अपक्ष) ५) डोणेकर शरद गोपाळराव- छताचा पंखा (अपक्ष) ६) पाटील सुभाष झिबल- करवत (अप क्ष) ७) बेलसरे किशोर मनोहरराव – कप बशी (प्रहार) ८) वाडिभस्मे योगेश रघुनाथ- धनुष्यबाण (शिवसेना) असे ८. करंभाड गट ना मा प्र महिला करिता १) गोमकाळे संजीवनी राजेश- धनुष्यबाण (शिवसेना),२) तांदुळकर सरोज विवेक राव- कमळ (भाजप),३) फुटाणे वर्षा विशेष- कपबशी (प्रहार) ४) भोयर अर्चना दिपक- हात (कॉग्रेस) असे ०४, माहुली गट ना मा प्र करिता १) कुथे अशोक नथुजी- कमळ (भाजप) २) कुसुंबे राजकुमार दौलत- हात (कॉग्रेस), ३) कोरचाम राजकुमार उमराव- करवत (गोंगपा) ४) कोरडे फजीराव फकडजी- झाडु (आम आदमी) ५) गदरे भगवान गणबा- धनुष्यबाण (शिवसेना) ६) चव्हा ण राजपाल पाडुरंग- गँससिलेंडर (भारि प बहुजन महासंघ) ७) चोले हितेश्वर धनराज- जेवणाची थाली (बळीराजा पार्टी) ८) राऊत चंद्रशेखर श्यामराव – कपबशी (प्रहार) असे ८ आणि ०४ गटाकरिता एकुण २४ पचायत समिती गण करिता टेकाडी (को. ख) अनु. जाती महिला करिता- १) झोड पायल आशिष – गँससिलेंडर (अपक्ष) २) भोवते करूणा टोलुराम-हात (कॉग्रेस) ३)भोवते वंदना नागसेन- कपबशी (प्रहार) ४) भोवते सुकेशनी प्रकाश-धनुष्यबाण (शिवसेना) ५) मेश्राम नम्रता अभिषेक – कमळ (भाजप ) असे- ०५, कांद्री गण सर्वसाधारण महिला – १) कावळे मिना प्रफुल- हात (कॉग्रेस ) २) घोंगरे मंगला जितेंद्र – कपबशी (प्रहार) ३) वंजारी राजहंस- कमळ (भाजप) ४) सरोदे शारदा राजु – धनुष्यबाण (शिवसेना), असे ०४, गोंडेगाव गण सर्वसाधारण महिला – १) काळे व्यकट काळे-धनुष्य बाण (शिवसेना) २) ठाकुर ललिता विठ्ठल- कपबशी (प्रहार) ३) भारव्दाज निकिता सिताराम- हात (कॉग्रेस) ४) लसुंते सरिता विलासराव- कमळ (भाज प) असे ०४ बनपुरी गण सर्वसाधारण -१) चकोले भरत विठोबा- कपबशी (प्र हार) २) निंबाळकर जयक्रिष्ण भाऊराव – धनुष्यबाण (शिवसेना) ३) बावनकु़ळे जितेंद्र दिवाळु- ट्रँक्टर (अपक्ष) ४) बावन कुळे राजु गणपत- बस (अपक्ष) ५) भोंडे नरेश पाडुरंग- गँससिलेंडर (अपक्ष) ६) मेश्राम नरेश अखडु- कमळ (भाजप) ७) येळणे विनायक मांगो- हात (कॉग्रेस) असे ०७, करंभाड गण अनु जमाती – १) पंधरे गजानन गेंदलाल-धनुष्यबाण (शिवसेना) २) पंधरे सचिन नंदलाल- कमळ (भाजप) ३) भलावी संदीप कंठा जी- हात (कॉग्रेस) असे ०३, नयाकुंड गण ना मा प्र महिला – १) कामडे सुनिता गजानन – कपबशी (प्रहार) २) तायवाडे सुनिता नानेश्वर- धनुष्यबाण (शिवसेना) ३) निबोणे मंगला उमराव- हात (कॉग्रेस) ४) निंबोणे सुनंदा राधेश्या म- कमळ (भाजप) असे ०४, माहुली गण सर्वसाधारण – १) आदेवार दिनेश शेषराव- धनुष्यबाण (शिवसेना) २) घोडमारे शालीकराम मयाराम- कमळ (भाजप) ३) डोनारकर श्रीराम ढोमन – जेवनाची थाली (बळीराजा पार्टी) ४) देशमुख चेतन शंकर- हात (कॉग्रेस) ५) नखाते राधेश्याम रमेश- कपबशी (प्रहार) असे ०५, चारगाव गण सर्वसाधारण – १) घंगारे किसन सिताराम – धनुष्यबाण (शिवसेना) २) दियेवार तुलसी प्रदीप – हात (कॉग्रेस) ३) बेंदरे शिशुपाल वामन -कमळ (भाजप) असे ०३ एकुण आठ गणाकरिता एकुण ३५ असे व गटाचे – २४ मिळुन एकुण ५९ उमेदवारांना चुनाव चिन्ह वाटप करण्यात आले.
ऐन वेळेवर काही राजकिय पक्षाने इतर पक्षातुन आलेल्यांना उमेदवारी दिल्याने बंडखोरी उफाळुन येण्याची शक्यता नाकारता येत नसुन पारशिवनी तालुक्यातील टेकाडी, गोंडेगाव व माहुली येथील निवडणुक चुरसीची ठरण्याचे संकेत दिसत आहे. या निवडणुकीत टेकाडी – ०४, गोंडेगाव- ०८, माहुली- ०८, करंभाड – ०४ असे ०४ गटाकरिता = २४ व प सं गणाकरिता – कांद्री ०४, टेकाडी- ०५, बनपुरी- ०७, गोंडगाव- ०४, करभाड – ०३, नयाकुंड-०४, माहुली- ०५, चारगाव- ०३ असे ०८ गणाकरिता ३५ व ४ गटाचे २४ असे एकुण ५९ उमेदवार निवडणुकित भाग्य आजमावित आहे. निडणुक निर्णय अधिकारी सौ. सुजाता पितम गंधे, व सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन तहसिलदार पारशिवनी वरूण कुमार सहारे यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचारी कामगीरी बजावित आहे.