Published On : Tue, Apr 7th, 2020

देशी दारू दुकानातुन देशी दारू च्या २२ पेटया व २१ बाटल्या ची चोरी

कन्हान : – नागपुर जबलपुर महामार्गा वरील जुना पोष्टआफिस जवळील हरि हर देशी दारू दुकानातुन चोरांनी मागचे दार तोडुन आत शिरून देशी दारूच्या २२ पेटया व २१ बाटल्या (बंपर) एकुण ६०९४८ रूपयांच्या मालाची चोरी केली.पोलीसानी दारू ११ पेटया व २१ बाटलसह आरोपी व दोन अल्पवयीन बालक ताब्यात घेत तपास सुरू आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुभाव वाढु नये म्हणुन देशभरात १८ मार्च पासुन दारू विक्रीची देशी, विदेशी दुकाने व चिल्लर विक्री दुकाने बंद करण्यात आली आहे. संपुर्ण देशात २१ दिवस म्हणजे १४ एप्रि ल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. या दरम्यान तळीरामांची चांगलीच पंचायत झाली आहे. कन्हान शहरात छुप्या मार्गा ने अवैधरित्या सरास देशी व विदेशी चौप्पट भावाने विक्री सुरू असल्याने तळीरामांना दारूचा पुरवठा होत आहे. संबधित विभागाने संपुर्ण दारू दुकाने शिलबंद केली आहे तरी सुध्दा हा दारू पुरवठा कुठुन होत आहे हा गंभीर प्रश्नच आहे. या अवैध देशी, विदेशी दारू जर डुप्पलीकट असल्यास पिण्या-याच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो यात दुमत नाही. याकरिता चक्क दारू दुकाने फोडत दारूच्या पेटया, बाट ल्या चोरल्या जात आहे.

शहरात सुध्दा कन्हान पोलीस स्टेशन पासुन अर्ध्या कि मी लांब महामार्गावरिल हरिहर देशी चि ल्लर दारू दुकानात मागची भिंत कुदुन मागच्या दार खालुन तोडुन आत शिरून चोरी झाल्याची माहीती सोमवार (दि.६) ला राज्य उत्पादक शुल्क विभागास देण्यात आल्याने घटनास्थळी राज्य उत्पा दक शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक अनिल जुमळे, आशिष वाकोडे, पोलीस रविंद्र चौधरी, संतोष जैस्वाल हयांनी पंच नामा करून चोरांनी दारूच्या २२ पेटया किंमत ५६२१२रू व २१ बाटल (बंपर) किंमत ४७३६ असा एकुण ६०९४८ रूप याचा मुद्देमाल चोरी झाल्याचे निष्पन केले.

कन्हान पोलीसानी आरोपीचा शोध घेत अार्यन उर्फ प्रदीप दिपक तायवाडे रा. विवेकानंद नगर कन्हान सह दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेऊन देशी दारूच्या ११ पेटया व २१ बाटल जप्त केल्या. कन्हान पोलीसानी फिर्यादी विनोद किरण टेकाम वय ३२ वर्ष रा. संताजी नगर कांद्री कन्हान याच्या तक्रारी वरून कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि नुसार गुन्हा नोंद करून थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू असुन ही कार्यवाही पो.उप निरिक्षक अमितकुमार आत्राम, पो सहा. निरक्षक मेश्राम, शेख, राजेंद्र पाली, शरद गिते, विरेंद्रसिह चौधरी, मंगेश सोनटक्के, राहुल रंगारी, संजय भदोरिया, राजेंद्र गौतम, मुकेश वाघाडे, सतिश टांडले सह पोलीस कर्मचा-यानी कामगि री बजावित मुद्देमालासह आरोपीस अटक केली असुन यात सहभागी आरोपीचा शोध घेत आहे.