Published On : Fri, Jun 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

खाटूश्याम दर्शनाला गेलेल्या कुटुंबाच्या घरात ६४ लाखांची चोरी; पाचपावली पोलिसांकडून दोघांना अटक

Advertisement

नागपूर : खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी राजस्थानला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरात झालेल्या तब्बल ६४ लाख रुपयांच्या चोरीचा पाचपावली पोलिसांनी यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, लॅपटॉप, मोबाईल आणि इतर चोरीचा मुद्देमाल असा एकूण सुमारे ६४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या आरोपींपैकी एक हा पीडित कुटुंबाचाच शेजारी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १८ जूनदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करीबाग परिसरात ही चोरी झाली. पीडित कुटुंब खाटूश्याम मंदिराच्या दर्शनासाठी बाहेरगावी गेले असताना आरोपींनी घराचे कुलूप व लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि मोबाईल असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी यश उर्फ बाबा बनसोड आणि अंशुल उर्फ अनुप वाकडे यांना अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ५९ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान अंशुल वाकडे याने २०२५ मध्ये लष्करीबाग परिसरात झालेल्या आणखी एका घरफोडीची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील सुमारे ४ लाख ८६ हजार रुपये किमतीची सोन्याची लगडही पोलिसांनी जप्त केली. दोन्ही गुन्ह्यांतील मिळून एकूण सुमारे ६४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Advertisement

तपासात असेही समोर आले की, अंशुल हा पीडित कुटुंबाच्या घराशेजारी राहत होता. कुटुंब दर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती त्याला आधीच होती. त्यानंतर त्याने साथीदारासह चोरीचा कट रचला. ओळख लपवण्यासाठी आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढून अटक केली.

सध्या पाचपावली पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून, शहरातील इतर घरफोड्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi #FireNews #News

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges