Published On : Fri, Jun 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

अंबाझरी तलावाच्या जलपर्णी निर्मूलन तसेच संवर्धनासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांचा पाठपुरावा; कामांना वेग

Advertisement

नागपूर : नागपूर शहराच्या पर्यावरणीय आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अंबाझरी तलावामध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून दूषित पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने जलपर्णी (एकोर्निया) या जलवनस्पतीने संपूर्ण तलाव व्यापला आहे. त्यामुळे तलावाचे पर्यावरणीय संतुलन बिघडण्यासह जलसाठ्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याने या गंभीर समस्येकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

या विषयाबाबत आमदार डॉ. परिणय फुके यांनी मागील वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न केले असून विधिमंडळाच्या अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. आगामी पावसाळी अधिवेशनातही या विषयावर लक्षवेधी सूचना मांडण्यात येणार असून अंबाझरी तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी करण्यात येणार आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सध्या नागपूर महानगरपालिकेमार्फत तलावातील जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जेसीबी, विशेष यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तलावाची स्वच्छता करण्यात येत आहे. या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज आमदार डॉ. परिणय फुके यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासमवेत अंबाझरी तलाव व उद्यान परिसराचा दौरा केला. यावेळी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

या संपूर्ण विषयाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक शिवानी दाणी आणि नगरसेवक योगी पाचपोर यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तलावातील वाढती जलपर्णी, प्रदूषणाची समस्या आणि संवर्धनाची गरज याबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधून या मोहिमेला बळकटी दिली.

Advertisement

यावेळी बोलताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, “अंबाझरी तलाव हा नागपूरकरांच्या भावविश्वाशी जोडलेला असून शहराचा पर्यावरणीय वारसा आहे. या तलावाचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही जनप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. मागील काही वर्षांत तलावामध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे जलपर्णीची समस्या गंभीर बनली होती. या समस्येच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून आता प्रत्यक्षात कामे सुरू झालेली पाहून समाधान वाटत आहे.”

यावेळी त्यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. “डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील विविध विकासकामांना तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित उपक्रमांना अधिक गती मिळाली आहे. प्रशासनामध्ये परिणामकारक कार्यसंस्कृती निर्माण करून त्यांनी अनेक प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अंबाझरी तलावातील जलपर्णी निर्मूलनाचे कामही त्यांच्या पुढाकारामुळे वेगाने सुरू असून नियोजनबद्ध पद्धतीने दर्जेदार काम होत आहे. नागपूरकरांच्या अपेक्षांनुसार हे काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे,” असे आमदार डॉ. फुके यांनी सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती देत तलावातील जलपर्णी निर्मूलन, पाण्याची गुणवत्ता सुधारणा आणि तलावाचे नैसर्गिक स्वरूप जतन करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

अंबाझरी तलावाचे पुनरुज्जीवन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या या मोहिमेमुळे भविष्यात नागपूरकरांना स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त अंबाझरी तलाव उपलब्ध होणार असून शहराच्या पर्यावरणीय समतोलालाही मोठा हातभार लागणार आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

आश्रमशाला में 21 छात्राओं से छेड़छाड़ का आरोप #POCSOCase #MaharashtraNews #Ashramshala #CrimeNews

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi #FireNews #News

कोंढाली में फार्म हाउस धू-धूकर जला, 40 मिनट में खाक! #NagpurNews #Chandanpardi...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges