Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, May 3rd, 2020

  आरोग्य उपकेंद्र चांपा येथे नियमित डॉक्टरच्या अनेक वर्षाच्या मागणीला अखेर यश आले

  सरपंच अतिश पवार यांचा पुढाकार

  चांपा: येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव अंतर्गत येणाऱ्या चांपा उपकेंद्राला अखेर डॉक्टरच्या मागणीला यश आले. सरपंच अतिश पवार यांनी ग्रामपंचायतचा प्रस्तावाद्वारे
  उमरेड तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली. असता सरपंच अतिश पवार यांच्या मागणीला अखेर यश आले.

  उमरेड तालुक्यातील चांपा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या चांपा,मागंली, खापरी, हळदगाव, परसोडी, तिखाडी, उमरा, दुधा, उटी, हेटी भिवापूर, कोलारमेट, पेंढरी, सुकळी, आदी गावाच्या नागरिकांना उमरेड व पाचगाव आरोग्य केंद्रात उपचार घेण्यास जावे लागत होते. नागपूर उमरेड महामार्गावर चांपा परिसरात अनेकांना वेळेवरच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला.

  नागपूर व उमरेड मार्गावर असलेल्या चांपा हे गाव मध्यस्थी असल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना उपचारासाठी एकमेव चांपा येथील प्राथमिक उपकेंद्र जवळ असल्याने सरपंच अतिश पवार यांनी चांपा येथे नियमीत डॉक्टरची मागणी शासनाकडे केली.

  पाचगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर आठवड्यातील तीन दिवस चांपा येथील आरोग्य उपकेंद्राला उपस्थीत राहणार आहेत. अखेर सरपंच अतिश पवार यांच्या मागणीला यश आले. सरपंच अतिश पवार यांच्या हस्ते डॉ. अतुल खंडेलवर यांचे पुष्पुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच अर्चना सिरसाम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वेंशाली वरठी, आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145