Advertisement
नागपूर : ताजबागमधील हजरत बाबा ताजुद्दीन दर्गाचे उर्स १० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या ऊर्सचे हे १०१ वे वर्ष असून यंदा १६ लाख श्रध्दाळू यात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उर्सच्या नियोजनासंर्दभात रविवारी बैठक घेतली. या उर्समध्ये येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरातील रस्ते मोकळे करावे, पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था, सुरळीत वीजपुरवठा, वाहनतळाची सोय करावी, पोलीस सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी, अशा सूचना गडकरी यांनी प्रशासनाला व ट्रस्टला बैठकीत दिल्या.
दरम्यान या बैठकीत आमदार प्रवीण दटके, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान उपस्थित होते.