Advertisement
मुंबई : जमिनीचा निकाल आपल्या विरोधात लागल्याने व्यथित झालेल्या एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या राधाबाई साळुंखे या महिलेने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयाच्या सुरक्षा विभागाने प्रसंगावधान दाखवत महिलेला ताब्यात घेतले.
त्यानंतर मारिन ड्राईव्ह पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु आहे.