Published On : Mon, May 20th, 2024
By Nagpur Today Nagpur News

प्रतीक्षा संपली; बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर,राज्य मंडळाची माहिती

Advertisement

नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतिक्षा विद्यार्थांना होती. मात्र आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (२१ मे) जाहीर करण्यात येणार आहे.राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकाल मंगळवारी जाहीर होणार असल्याचे म्हणाले. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल, असेही म्हणाले.

दरम्यान बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५.१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात विज्ञान शाखेसाठी सर्वाधिक सात लाख ६० हजार ४६ विद्यार्थी, कला शाखेसाठी तीन लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखेसाठी तीन लाख २९ हजार ९०५, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ३७ हजार २२६, आयटीआयसाठी चार हजार ७५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Advertisement