मुंबई : देशभरातील ४९ राज्यांमध्ये पाचव्या टप्प्यात आज मतदान होत असून दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३६.७३ टक्के मतदान पार पडले आहे. तर राज्यातल्या १३ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात २७.७८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी- धुळे- २८.७३ टक्के,दिंडोरी- ३३.२५ टक्के, नाशिक – २८.५१ टक्के पालघर- ३१.०६ टक्के भिवंडी- २७.३४ टक्के, कल्याण – २२.५२ टक्के, ठाणे – २६.०५ टक्के, मुंबई उत्तर – २६.७८ टक्के,मुंबई उत्तर – पश्चिम – २८.४१ टक्के, मुंबई उत्तर – पूर्व – २८.८२ टक्के, मुंबई उत्तर – मध्य – २८.०५ टक्के, मुंबई दक्षिण – मध्य- २७.२१ टक्के, मुंबई दक्षिण – २४.४६ इतके टक्के मतदान पार पडले.
दरम्यान राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या मतदारसंघात मदान सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांसह अनेक नेते, राजकारणी ते सेलिब्रिटींनी आपला मतदान हक्क बजावला आहे.









