Published On : Thu, Dec 5th, 2019

शेतकऱ्यांच्या हिताचा आवाज होईल:नाना पटोले

उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात

नागपूर: मी विदर्भाच्या मातीतला माणूस आहे,स्वत:ची जमीन विसरणार नाही. विधान सभा अध्यक्ष् पद माझ्यासाठी फार मोठी जबाबदारी आहे. हे संवैधानिक पद आहे.सर्व सदस्यांच्या मौलिक अधिकारांचे रक्ष् ण करणे हे माझे कर्तव्य असणार आहे.सर्वच सदस्यांनी आपापल्या मतदारसंघातील समस्या मोकळेपणाने मांडाव्यात मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष्ातील सभासद असो. न्यायमूर्ती ज्याप्रमाणे दोन्ही बाजू ऐकून घेतो मग निकाल देतो त्याच धर्तीवर निर्णय देण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी विधान सभा अध्यक्ष् या नात्याने राजकीय टिपण्णी करणार नाही मात्र माझं अध्यक्ष् पद हे राज्याच्या हिताची गोष्ट होईल आणि शेतकर्यांच्या हिताचा आवाज होईल असे विधान सभा अध्यक्ष् नाना पटोले हे म्हणाले.

नाना पटोले यांनी बुधवार दि. ४ डिसेंबर रोजी नागपूर प्रेस क्लब तसेच श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’ अंतर्गत पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.याप्रसंगी अनेक प्रश्‍नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिलीत. याप्रसंगी मंचावर प्रेस क्लबचे अध्यक्ष् प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार राहूल पांडे, आमदार विकास ठाकरे, काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अतूल पांडे, प्राचार्य बबनराव तायवाडे,जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार आदी उपस्थित होते.


पहीलाच प्रश्‍न हा नागपूरातील हैदराबाद हाऊसमधील‘मिनी मंत्रालय’बंद करण्यावर विचारण्यात आला.विदर्भाच्या माणसाला आपले प्रश्‍न घेऊन पुन्हा मुंबईची वारी करावी लागणार हा विदर्भावर अन्याय नाही का?यावर बोलताना मूळात सरकार स्थापनेस वेळ लागला या दरम्यान हे मंत्रालय बंद झाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेऊ. हे मंत्रालय सुरु करण्याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री यांना विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.

‘नागपूर कराराप्रमाणे’ विधान सभेचे शीतसत्र हे चार आठवडे चालले पाहिजे मात्र यंदा ते फक्त एकाच आठवड्याचे कां आहे?यात प्रश्‍नोत्तराचा तास तरी राहील का?असा प्रश्‍न उपस्थित विचारला असता यावर उत्तर देताना पटोले हे म्हणाले की, मी अध्यक्ष् होण्यापूर्वीच अधिवेशनाच्या कालावधीबाबत निर्णय ठरला होता. हे आधीच ठरलेलं होतं. सत्ता व विपक्ष् यांच्यासोबत चर्चा करुन बीएसएच्या बैठकीत याबाबत नक्कीच निर्णय घेऊ.एवढ्या कमी कालावधीत विदर्भाच्या जनतेचे प्रश्‍न,विदर्भाच्या विकासाचे प्रश्‍न यावर चर्चा होणे अशक्य आहे. नागपूर करारानूसार चार आठवडे अधिवशेन चालावे माझी देखील हीच संकल्पना आहे.पुढच्या काळात करारानूसार पूर्ण काळ अधिवशेन व्हाचे यासाठी प्रयत्न करेल असे आश्‍वासन त्यांनी दिले.मी देशपातळीवर काम केले आहे. मला जाणीव आहे देशात सर्वाधिक आत्महत्या या विदर्भात झाल्या आहेत त्यामुळे विदर्भाच्या प्रश्‍नावर करारानूसार अधिवशेन हे पार पडले पाहिजे यासाठी या पुढे नक्कीच प्रयत्न करणार.

सध्या देशात चर्चिल्या जाणारे राज्यातील ऐंशी लाख कोटी रुपये केंद्राला परत करण्याविषयीच्या चर्चे मागील ‘सत्य’विचारले असता,हे दायित्व सरकारचे आहे.विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्राच्या जनतेला आश्‍वासन दिले आहे की हे सरकार शेतकर्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी पैसे कूठून आणायचा ही सरकारची जबाबदारी आहे. माझे कर्तव्य हे विधान सभेत जे काही आश्‍वासन दिले जात आहेत त्याची पूर्तता होते आहे की नाही हे बघण्याचे आहे.

नागपूर अधिवेशन हे सभासदांसाठी फक्त सहलीसाठी किवा हूर्डा पार्टीसाठी आयोजित होत असल्याची धारणा जनतेमध्ये आहे,या प्रश्‍नावर बोलताना, जे काही दिवस अधिवशेन सुरु राहील त्या काळात विदर्भाचे सर्वकष प्रश्‍न यावे याकडे मी लक्ष् देणार असल्याचे ते म्हणाले. तुम्हाला विधान सभा अध्यक्ष् बनवून विदर्भाचा आवाजच दाबून टाकण्यात आला आहे का?या प्रश्‍नावर बोलताना, उलट मला आता जास्त संधी मिळाली असल्याचे ते म्हणाले. आवाज दाबण्याची नव्हे तर अंमलात आण्याची संधी मला अध्यक्ष् या नात्याने प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. बरेचदा विदर्भाच्या बाहेरील प्रश्‍नांवरच सभेत गोंधळ होत असल्याकडे लक्ष् वेधले असता कंट्रोल करणं आता माझ्या हातात असल्याचे ते म्हणाले.

एका प्रश्‍नावर बोलताना हे सरकार ‘अच्छे दिन’चे आश्‍वासन देऊन सत्तेवर आले नसून अत्यंत विपरीत परिस्थित सत्तेवर आले आहे. आता जनतेला चांगले काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. वेगळ्या विदर्भाबाबतची त्यांची भूमिका काय?यावर बोलताना ही जबाबदारी सरकारची आहे. सभागृहात यासंबधीचा विषय आला तर मी यावर टिपण्णी करु शकतो मात्र सभागृहात हा विषय आणने हे माझ्या अधिकारात येत नसल्याचे ते म्हणाले. व्यक्तिगतरित्या वेगळ्या विदर्भाबाबत त्यांची भूमिका काय?हा देखील प्रश्‍न अत्यंत शिफातीने टोलवताना नाना पटोले यांनी व्यक्तिगतरित्या माझ्या खूप सार्या भूमिका आहेत मात्र त्या भूमिकांबाबत बोलता येत नसल्याचे ते म्हणाले. लहान कुटुंबाप्रमाणेच लहान राज्ये ही जलद गतीने विकास करु शकतात, भारतीय जनता पक्ष् किवा इतर कोणत्याही पक्ष्ाने वेगळ्या विदर्भाचा प्रश्‍न विधान सभेत मांडल्यास त्यावर चर्चा निर्भर करते. विदर्भ ही तर माझी जमीन आहे आणि ‘आपल्या’जमीनीविषयी मी विचार तर करणारच,असे सूचक शब्द त्यांनी वापरले.

यावेळी विशेषहननाधिकाराविषयी प्रश्‍नाला सामोरे जाताना, लोकप्रतिनिधी व प्रशासकीय व्यवस्था ही दोन महत्वाची चाके असल्याचे ते म्हणाले. खासदार झाल्यावर जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत मी हेच सूचित केले मी जसा जनतेचा नोकर आहे तसेच तुम्ही देखील जनतेचे नोकरच आहात.ज्या दिवशी लोकप्रतिनिधी किवा नोकरशाही ही स्वत:ला मालक समजू लागते तेव्हा ते जनतेला न्याय देऊ शकत नाही. पुढे बोलताना ते म्हणाले की विदर्भात सर्वात मोठा प्रश्‍न हा वन जमिनीचा आहे.आघाडी असो किवा युतीचा शासनकाळ,हा प्रश्‍न प्रबंलितच राहीला.केंद्रामुळे मान्यता मिळत नाही असा अारोप त्यांनी केला. ‘जय’नावाच्या वाघाचा प्रश्‍न यासाठीच लोकसभेत उपस्थित केला,मंत्रालयापर्यंत हे प्रकरण नेले. खूप आतपर्यंत याचे धागे-दोरे गुंतले असून यासाठीच चौकशी करण्यास बाध्य केले. हेच प्रशासन गोसेखूर्दच्या प्रकल्पात देखील आडकाठी लावून ठेवतात.गोसेखूर्द टप्पा-२ च्या मध्ये याच प्रशासनाने निर्माण केलेली आडकाठी,जयच्या प्रश्‍नावरुन दूर केली असल्याचे त्यांनी सांगितले.सिंचन प्रकल्पाचा पैसा हा परत जात होता. आता हा प्रकल्प २०२१-२०२२ पर्यंत पूर्ण करु असे आश्‍वासन नाना पटोले यांनी दिले.प्रशासकीय व्यवस्थेत काही अधिकारी हे चूकीचे बसले आहेत मात्र शेतरर्यांच्या प्रश्‍नावर तडजोड करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे कायदा हे माणसे व पशू यांच्या संरक्ष् णासाठी आहेत त्याचप्रमाणे पशूंची संख्या जास्त झाल्यास त्यांची संख्या कमी करण्यासाठी देखील कायद्याच सांगतो याकडे त्यांनी लक्ष् वेधले.

नव्या सरकारमध्ये ‘कृषि मंत्री’होण्याची क्ष् मता असताना अध्यक्ष् पद का स्वीकारले,या प्रश्‍नावर बोलताना आता सर्वच मंत्रालय माझ्या जवळ असल्याची मिश्‍किली त्यांनी केली. ही खूप मोठी संधी असून मुख्यमंत्री पासून तर सर्वच सभासद हे अध्यक्ष्ाच्या अधीन येतात असे ते म्हणाले. मला राजकीय बोलता येणार नाही पण जनतेच्या हिताच्या प्रश्‍नावर खूप बोलता येण्यासारखं आहे.

गुरुंशी भेट नाही झाली-

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवताना गुरु-शिष्य ही जुगलबंदी चांगलीच रंगली होती.यावर नागपूरात आल्यावर तुम्ही तुमच्या गुरुंना भेटलात का?या प्रश्‍नावर बोलताना गुरुंना भेटायचे होते मात्र ते शहरात नाहीत मात्र दकेेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली,ते माझे खूप चांगले मित्र असल्याचे ते म्हणाले. अध्यक्ष या नात्याने जे कोणी लोक प्रतिनिधी आहेत त्यांचे संवैधानिक अधिकार जोपासण्याचे माझे काम असल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.