Published On : Mon, Apr 19th, 2021

सावळी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टी गुन्हे शाखे ग्रामिणनी उध्वस्त केली

– अवैधरित्या दारू वाहतूक करणारेअटक,एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

पारशिवनी:-पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी शिवारात सुरू असलेल्या गावठी दारू भट्टीची गुप्त माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नागपूरच्या पथकाने शनिवारी (१७ एप्रिल) धडक कारवाई करून गावठी दारूभट्टी उध्वस्त केली. तसेच अवैधरित्या दारू वाहतूक करणार्‍यावर धडक कारवाई करून एकूण ३लाख ९ हजार ४00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली.

कोरोनाच्या वाढता उद्रेकामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक नियमीतपणे विविध ठिकाणी गस्त करीत आहेत. शनिवारी रात्री एक पथक रामटेक उपविभागात गस्त करीत असताना पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पोलिस स्टेशन पारशिवनी हद्दीतील सावळी शिवारात एका नाल्याच्या बाजुला सर्रासपणे गावठी दारू गाळण्याचे कार्य सुरू आहे.


माहितीवरून सदर ठिकाणी धाड टाकली असता(१) एकनाथ संतोष भलावी (वय ४२), (२)मुरलीधर गोविंदा शेन्द्रे (वय ४४), (३)अमोल ईश्‍वर मसस्कोल्हे (वय २३) सर्व रा. बनेरा, ता. पारशिवनी, जि. नागपूर हे लोक मोठय़ा प्रमाणावर भट्टी लाऊन अवैधरित्या मोहाफुलाची गावठी दारू गाळण्याचे कार्य करीत असताना मिळून आले. यावेळी २७0 लीटर मोहाफुल तयार दारू किं. ४0,५00 रुपये, मोहाफुल सडवा २४00 लिटर एकूण २ लाख ४0 हजार रुपये, दारू गाळण्याचे २५ हजार ५00 रुपयांचे साहित्य, असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारू व मोहाफुल सडवा मोक्यावर नाश करण्यात आला. आरोपीविरुद्ध पारशिवनी ठाण्यात येथे गुन्हा नोंद करून आरोपीला पुढील कार्यवाहीकरिता ताब्यात घेण्यात आले.